esakal | महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरण : भुजबळांच्या निर्दोष मुक्ततेनंतर समर्थकांचा जल्लोष
sakal

बोलून बातमी शोधा

 maharashtra Sadan scam case

नाशिक : भुजबळांच्या निर्दोष मुक्ततेनंतर समर्थकांचा जल्लोष

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

नाशिक : महाराष्ट्र सदन कथित घोटाळा प्रकरणी (maharashtra sadan scam case) राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) , माजी खासदार समीर भुजबळ व इतरांची आज सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. त्यानंतर नाशिक येथील भुजबळ फार्म (Bhujbal Farm) येथील कार्यालयात समर्थकांकडून न्यायालयाच्या निर्णयाचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी फटाके, ढोल ताशा वाजवत पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला.

मंत्री छगन भुजबळ व कुटुंबियांना बदनाम करण्यासाठी त्यांच्यावर खोटे आरोप करण्यात आले होते. या प्रकरणी गेल्या ५ वर्षांपासून लढा सुरु होता. न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास आहे. भुजबळ साहेब व इतर सर्व या प्रकरणातून निर्दोष सुटतील असा आमचा ठाम विश्वास होता. तो विश्वास आज न्यायालयाच्या निर्णयांनंतर अधिक पक्का झाला आहे. महाराष्ट्र सदन कथित घोटाळा प्रकरणी न्यायालयाच्या या निर्णयाचे आम्ही नम्रपणे स्वागत करतो अशा भावना यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.

हेही वाचा: बाप्पाच्या स्वागतासाठी उत्साह शिगेला! खरेदीसाठी इगतपुरी, घोटीत गर्दी

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार, समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक, शहराध्यक्ष संतोष सोनपसारे, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे, महापलिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर, संजय खैरनार, नाना पवार, धीरज बच्छाव, महेश भामरे, अमर वझरे, बाबा कोकणी, श्रीराम मंडळ, शशी बागुल, योगेश निसाळ, सागर बेदरकर, गणेश खोडे, धनंजय निकाळे, शंकर मोकळ, नाना सोमंवशी, रवींद्र शिंदे, संतोष कमोद, दिनेश कमोद, जय कोतवाल, राहुल कमानकर, करण आरोटे, कृष्णा काळे, राहुल तुपे, सचिन मोगल, मुकेश शेवाळे, उदय सराफ, भालचंद्र भुजबळ, हर्षल चव्हाण, हर्षल खैरणार, नितीन अमृतकर, अक्षय परदेशी, शरद काळे, किरण सूर्यवंशी, आकाश कासार, धर्मराज काथवटे, विकी पाटील, यांच्यासह यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, अखिल भारतीय समता परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा: नाशिक : लष्कर भरती रॅकेटचा गुन्हे शाखेच्या मदतीने पदार्फाश!

loading image
go to top