esakal | लॉकडाऊनमध्ये लाल परीची सेवा बंद! मात्र त्या काळात कर्मचाऱ्यांनी केलं अनोखं काम.. एकदा वाचाच
sakal

बोलून बातमी शोधा

During the lockdown fruit trees were planted nashik marathi news

सहा महिन्यांपूर्वी बदलून आलेले आगार प्रमुख यांनी आपल्या सर्व कर्मचार्यांना विश्वासात घेत टप्याटप्याने कर्मचारी बोलहून सोशल डिस्टिंगस चे नियम पाळत एक एकर जागेवरील काटेरी झुडपे काडून जागा साफ केली आणि...

लॉकडाऊनमध्ये लाल परीची सेवा बंद! मात्र त्या काळात कर्मचाऱ्यांनी केलं अनोखं काम.. एकदा वाचाच

sakal_logo
By
भगवान हिरे

नाशिक/साकोरा : कोरोनाचा पशवभूमीवर लोकडाऊनमुळे गेल्या पाच महिन्यापासून लाल परिची सेवा बंद असल्यामुळे नांदगाव आगाराचे अगरप्रमुख विश्वास गावित यांनी आपल्या 248 कर्मचार्यांना बरोबर घेत डेपोच्या परिसरात एक एकर जागेवरील काटेरी झुडपे तोडून माशागत करत वेगवेगळ्या प्रकारचे 350 झाडाची लागवड करत समजा पुढे नवा आदर्श घडवला.

सहा महिन्यांपूर्वी बदलून आलेले आगार प्रमुख यांनी आपल्या सर्व कर्मचार्यांना विश्वासात घेत टप्याटप्याने कर्मचारी बोलहून सोशल डिस्टिंगस चे नियम पाळत एक एकर जागेवरील काटेरी झुडपे काडून जागा साफ करून त्यात सर्व कर्मचार्यांना खड्डे वाटप करून नारळ, केशर, चिकू, पेरु,ऍपलबोर,सीताफळ,मोसंबी , आंबा असे वेगवेगळ्या प्रकारचे तीनशे पन्नास झाडे लावून त्यांच्या निगराणी साठी कर्मचार्यांची आळीपाळीने नेमणूक केली. तसेच बस डेपोच्या चौ बाजूला मोठ्या प्रमाणावर गवत झाले होते ते आपल्या डेपोतील ड्राइवर व कंडकटर यांच्या जवळ उभे राहून काडून घेतले. रात्री बेरात्री बस स्टँड व आगार दिसत नव्हते दर्शनी भागात मोठा बोर्ड लावून बोर्ड वरती लाईटची सोय करण्यात आली. नांदगाव बस आगारातील आगारप्रामुख व कर्मचाऱ्यांचे परिसरात कौतुक होत आहे.

हेही वाचा > दुर्दैवी! बैलपोळ्याच्या पूर्वसंध्येला अचानक आलेल्या 'त्या' बातमीने ममदापूर हळहळले..काय घडले नेमके?

"माझ्या आदीपत्या खलील सर्व कर्मचारी यांनी मी सांगितल्या प्रमाणे एक एकरवरील काटेरी झुडपे काडून तिथे फळ झाडांची लागवड केली याचा मला अभिमान असून पुढील काळातही नवीन उपक्रम कर्मचाऱ्यांच्या मदतीने राबवणार आहे."
-विश्वास गावित, रा.प.आगार प्रमुख, नांदगाव.

" लॉक डाऊन काळात कोणतेही काम नसताना आम्ही कर्मचारी आळशी होत चाललो होतो परंतु आगारप्रमुख यांनी सुचविले कामातून आमचा शारीरिक व्यायाम झाला व आज आमच्यात कोणताही आळस राहिला नाही. आता बस चालू झाल्या आहेत परत नवीन जोमाने आम्ही कामाला लागू." पपू पाटील (चालक) ,नांदगाव

हेही वाचा > धाबे दणाणले! नियुक्ती होऊनही उमेदवार कामावर नाही?कारवाई तर होणारच

" एसटी महामंडळाची बिकट परिस्थितीत आम्ही महामंडळाच्या पडीत जागेवरचे काटेरी झुडपे काडून फळ झाडे लावली. झाडांची निगराणी चालू
कामात वेळ मिळाल्यास आम्ही करत असतो." -अरुण इप्पर (सहाय्यक कारागीर), नांदगाव आगार .

संपादन- रोहित कणसे

loading image
go to top