रमजान पर्वात मालेगावची बदलली दिनचर्या; रात्रीच्या खरेदीला उधान

during Ramadan Malegaon routine change night shopping trending Nashik News
during Ramadan Malegaon routine change night shopping trending Nashik Newsesakal

मालेगाव (जि. नाशिक) : रमजान पर्वात शहरातील मुस्लीमबहुल भाग असलेल्या पूर्व भागातील नागरीकांची दिनचर्या बदलली आहे. ४३ अंशावर असलेले तापमान व रमजानचे उपवास (Ramzan Eid) यामुळे दिवसभर बाजारपेठा व गल्ली- मोहल्ल्यांमध्ये शुकशुकाट असतो. सकाळी उपवास ठेवण्याची वेळ असल्यामुळे भल्या पहाटेपासूनच मालेगावातील गजबज सुरु होते. उन्हामुळे ईदच्या खरेदीला रात्रीच प्राधान्य दिले जात आहे. मध्यरात्रीपर्यंत शहरातील बाजारपेठा गजबजून जात आहेत.

रमजान पर्वात शहराची दिनचर्या एकदम बदलली आहे. एरव्ही सकाळी उशिरा उठणारे मालेगावकर उपवास ठेवण्याची वेळ असल्यामुळे भल्या पहाटे उठत आहेत. महिला- भगिनींची पहाटे तीनपासूनच स्वयंपाकाची लगबग सुरु होते. उपवास (रोजा) सुरु होत असल्याने पहाटे पाचच्या आत जेवण करावे लागते. ज्या कुटुंबात शाळकरी मुलांनी रोजे ठेवले आहेत अशा कुटुंबातील महिलांनी मुलांना सकाळी लवकर उठवून त्यांना जेवण घालावे लागते. दुपारी चारनंतर विशेष बाजारात भाजीपाला, फळे आदी खरेदीसाठी गर्दी होते. सायंकाळी उपवास सोडण्याच्या आधी महिलांना स्वयंपाक करावा लागतो. एकूणच रमजान पर्वात महिलांची धावपळ होते.

during Ramadan Malegaon routine change night shopping trending Nashik News
पित्याला आदर्श शिक्षक पुरस्कार; लेकीला शिष्यवृत्तीत गोल्ड मेडल

शहरातील दुकाने, प्रतिष्ठाने व व्यवहार एरव्ही सकाळी अकरानंतर सुरु होतो. रमजान पर्वात मुस्लीम बांधव लवकर उठत असल्याने सकाळपासूनच दळणवळण सुरु होते. शहरात ४३ अंशावर तापमान आहे. बहुसंख्य जण उपवास व उन्हामुळे दुपारी आराम करतात. उपवास सोडण्याची वेळ असल्याने सायंकाळी सहा ते सात या एक तासात पुर्व भागातील रस्ते जणू निर्मनुष्य होतात. रात्री नऊनंतर पुन्हा गजबज सुरु होते. येथील किदवाई रस्त्यासह सर्व प्रमुख बाजारपेठा, दुकाने, प्रतिष्ठाने रात्री उशिरापर्यंत सुरु असतात.

during Ramadan Malegaon routine change night shopping trending Nashik News
उन्हामुळे टायर उद्योगाला सुगीचे दिवस; रिमोल्ड टायरकडे वाढतोय कल

रमजानचे २० रोजे पूर्ण झाल्याने सर्वांनाच आता ईदच्या खरेदीचे वेध लागले आहेत. खरेदीसाठी नागरीक कुटुंबियांसह बाहेर पडत असल्याने मध्यरात्रीही मालेगाव गजबजून जाते. येथील व्यावसायिकांनी दुकाने व प्रतिष्ठानांवर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी रोषणाई करण्यात आली आहे. कापड, चप्पल, बुट व सौंदर्य प्रसाधनांच्या दुकानांवर मध्यरात्रीपर्यंत गर्दी होत आहे.

during Ramadan Malegaon routine change night shopping trending Nashik News
25 वर्षांपासून हातपंप भागवतोय तहान; जलकुंभ मात्र जैसे थे

खाद्य पदार्थांची लगीनघाई
रमजानचे उपवास असल्याने शहरातील पूर्व भागातील गल्ली- मोहल्यांमध्ये दिवसभर शुकशुकाट असतो. हॉटेल, उपहारगृह, पान दुकान, मिठाईचे दुकान, बीफ विक्रेते, चहा टपरी व इतर खाद्य पदार्थांच्या दुकानांवर दिवसभर फारसे ग्राहक फिरकत नाहीत. उपवास व उन्हामुळे नागरीक रात्रीच घराबाहेर पडतात. त्यामुळे खाद्यपदार्थ विक्रेत्यांचा व्यवसाय देखील रात्रीच होत आहे.

येथे हॉटेल, उपहारगृह, चहा दुकाने, अंडा भुर्जी, चायनीज, चिकन टिक्का, पुलाव, बिर्याणी, कबाब, खिरी, चायनीज, हलवा पराठा, नान, बर्फी, सोडा, बर्फगोळा, रबडी, लस्सी, आईस्क्रीम, कुल्फी आदी विक्रेत्यांच्या दुकानांवर देखील रात्री रेलचेल असते. कुसुंबा रोड, इस्लामपुरा, आयेशानगर, आझादनगर, चंदनपुरीगेट, मच्छीबाजार, नवीन बसस्थानक, किदवाई रोड, पेरी चौक, भिक्कु चौक, पवारवाडी, मोहंमद अली रोड, सुलेमान चौक, रौनकाबाद आदी भागात खवय्यांची मध्यरात्रीपर्यंत गजबज दिसून येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com