नायलॉन मांजा ६५ पक्ष्यांसाठी ठरला कर्दनकाळ! वर्षभरात १७१ जखमी पक्ष्यांची सुटका 

During the year 171 birds were injured by being trapped in nylon manja nashik marathi news
During the year 171 birds were injured by being trapped in nylon manja nashik marathi news
Updated on

जुने नाशिक : नायलॉन मांजात अडकून जखमी झालेल्या वर्षभरात १७१ पक्ष्यांची अग्निशमन विभागाकडून सुटका करण्यात आली. सर्वाधिक मार्च महिन्यात २९ ते सर्वांत कमी ऑक्टोबर महिन्यात नायलॉन मांजात अडकून पक्षी जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहे. तर सुमारे ६५ पक्ष्यांचे मृत्यू झाले आहे. 

यंदा महिलेचा देखील मृत्यू

नायलॉन मांजा दर वर्षी पक्ष्यांचा कर्दनकाळ ठरत आहे. झाडांमध्ये किंवा मोबाईल टॉवर, इमारतींच्या गच्चीवर मांजा अडकून असतो. त्यात पक्षी अडकून जख्मी आणि मृत्यू होण्याच्या घटना घडत असतात. गेल्या अनेक वर्षापासून पक्षीमित्रांकडून नायलॉन मांजावर बंदी आणण्याची मागणी केली जात आहे. सरकारने कागदोपत्री मांजावर बंदीही आणली आहे. प्रत्यक्षात मात्र, आजही शहराच्या विविध पतंग दुकानांमध्ये मांजा विक्री होताना दिसत आहे. त्यांचे जिवंत उदाहरण म्हणजे मंगळवारी (ता. २९ डिसेंबर) द्वारका भागात नायलॉन मांजामुळे महिलेचा झालेला मृत्यू. दरम्यान, ६५ पक्षी मृत झाले, तर बहुतांशी जखमी झाले. यात जखमी होण्याचे प्रमाण अधिक आहे.

अन्यथा पक्षी मृत्यू संख्या वाढली असती

२०२० वर्षाचा विचार केला तर वर्षभरात शहराच्या वेगवेगळ्या भागात एकून १७१ विविध पक्षी जखमी झाले आहेत. अग्निशमन विभागाने वेळीच घटनास्थळी दाखल होत त्यांची सुटका केल्याने त्यांचे जीव वाचले. अन्यथा पक्षी मृत्यू संख्या वाढली असती. जानेवारी आणि मार्चमध्ये पक्षी जखमी होण्याचे प्रमाण अधिक होते. त्यानंतर जखमी होण्याचे प्रमाण कमी होत गेले. ऑक्टोबर आणि डिसेंबर महिन्यात अत्यंत कमी प्रमाण होते. दर वर्षी डिसेंबर, जानेवारीत जख्मी होण्याचे प्रमाण अधिक असते. २०२० मध्ये डिसेंबर महिन्याच्या जागा मार्च महिन्याने घेतली. 

महिना आणि पक्षीनिहाय जखमी 

पक्षी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर 
कावळा ७ ५ ७ ५ ६ १३ ७ ५ ५ २ ४ २ 
कबूतर ७ २ ८ २ २ -- २ १ २ १ ३ १ 
घार १ २ ६ ३ १ १ -- १ -- -- १ -- 
वटवाघूळ ५ १ १ १ १ १ -- १ ३ -- १ -- 
बगळा १ -- १ ३ -- २ -- १ -- -- -- -- 
कोकिळा २ १ १ १ -- -- -- -- १ -- -- ३ 
करकोचा १ -- २ १ १ १ -- -- -- २ १ -- 
पानकोंबडी १ -- -- -- -- -- -- -- -- -- -- -- 
पारवा १ -- -- -- -- -- -- -- -- -- -- -- 
साळुंकी -- -- १ -- १ १ १ -- -- १ -- -- 
घुबड -- १ २ -- -- -- -- १ -- ३ २ 
पोपट -- -- -- -- -- -- -- १ -- -- -- --

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com