ST Bus Route Change
sakal
नाशिक: द्वारका चौक परिसरात भुयारी मार्ग उभारणीच्या कामाला सुरुवात होत असून, वाहतुकीसाठी हा परिसर बंद केला जाणार आहे. याबाबत अधिसूचना जारी केल्यानंतर आता एसटी महामंडळाने बसगाड्यांच्या मार्गात बदल केले आहेत. त्यानुसार धुळे, पेठ यांसह सप्तशृंगगड, छत्रपती संभाजीनगरसाठी रविवार (ता. १)पासून निमाणी बसस्थानकावरून बसगाड्या उपलब्ध होतील.