Nashik News: द्याने- रमजानपुरा पोलिस ठाण्याचे रुपडे पालटणार! पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

Guardian Minister Dada Bhuse along with Superintendent of Police Shahaji Umap and others during the foundation laying and unveiling of the cornerstone of Dayane-Ramajanpura new police station building in the city.
Guardian Minister Dada Bhuse along with Superintendent of Police Shahaji Umap and others during the foundation laying and unveiling of the cornerstone of Dayane-Ramajanpura new police station building in the city.esakal

मालेगाव : द्याने- रमजानपुरा पोलिस ठाण्याचे रुपडे पालटणार असून त्यासाठी शासनाकडून निधी मंजूर झाला असून पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते सोमवारी (ता.११) पोलिस ठाणे इमारतीचे भूमिपूजन झाले.

नवी पोलिस स्टेशन इमारतीचे काम दर्जेदार व अत्याधुनिक सर्व सुविधायुक्त जलदगतीने होणार असून नागरिकांना अधिकाधिक दर्जेदार सेवा सुविधा उपलब्ध होणार आहे. (Dyane Ramzanpura Police Station will change Bhumi Pujan by Guardian Minister Nashik News)

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल, विशेष पोलिस महानिरिक्षक बी. जी. शेखर-पाटील, पोलिस अधिक्षक शहाजी उमाप, महाराष्ट्र राज्य पोलिस गृह निर्माण महामंडळाच्या अधिक्षक अभियंता अनिता परदेशी, अपर पोलिस अधिक्षक अनिकेत भारती, उपअधिक्षक पुष्कराज सूर्यवंशी, सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष रोही आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. भुसे म्हणाले, रमजानपुरा परिसरात मध्यमवर्गीय व गोरगरीबांची वस्ती आहे. या परिसरात पावरलुम व टेक्सटाईलसंबंधी अनेक प्रकल्प व उद्योगधंदे आहेत. या प्रकल्प व व्यवसायाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती झाली आहे.

या भागातील कायदा-सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी व परिसरात होत असलेले विविध गुन्हयांवर आळा घालतानाच नागरिकांच्या सोईसाठी मध्यवर्ती ठिकाणी इमारत आकाराला येत आहे.

Guardian Minister Dada Bhuse along with Superintendent of Police Shahaji Umap and others during the foundation laying and unveiling of the cornerstone of Dayane-Ramajanpura new police station building in the city.
Onion Export Ban: निर्यातबंदीनंतर कांदा दोन ते अडीच हजारांवर! शेतकऱ्यांच्या नुकसानीला जबाबदरा कोण?

शहर व तालुका संवेदनशिल असल्याने पुरेसे मनुष्यबळ, वाहने, उपकरणे उपलब्ध करून द्यावीत असे त्यांनी श्री. शेखर यांना सुचविले. शहरात लवकरच नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार मौलाना मुफ्ती म्हणाले, की नागरिकांची सुरक्षा प्रथम प्राधान्य आहे. सुरक्षा व शांतता अबाधित ठेवण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. श्री. भुसे यांच्या माध्यमातून विविध विकासकामे प्रगतिपथावर आहेत. येथील विविध भागाच्या गरजेनुसार पोलिस ठाण्यांची निर्मिती व्हावी.

यावेळी विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील, पोलिस अधिक्षक शहाजी उमाप व अपर पोलिस अधिक्षक अनिकेत भारती यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास पदाधिकारी, ग्रामस्थ, रहिवासी बहुसंख्येने उपस्थित होते.

Guardian Minister Dada Bhuse along with Superintendent of Police Shahaji Umap and others during the foundation laying and unveiling of the cornerstone of Dayane-Ramajanpura new police station building in the city.
Sharad Pawar News: केंद्राच्या धरसोडीचा शेतकऱ्यांना जबर फटका : शरद पवार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com