Nashik News : निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांचे अर्थचक्र कोलमडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Soyabin News

Nashik News : निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांचे अर्थचक्र कोलमडले

पिंपळगाव बसवंत : सध्या सोयाबीनचे बाजारभाव हे उलट्या दिशेने सुरू असून यामध्ये सातत्याने घसरण होताना दिसत आहे. त्यामुळे सोयाबीन दराला लागलेली साडेसाती कधी संपणार, याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत.

भाववाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी गेल्यावर्षीचे अधिक यावर्षीचे सोयाबीन साठा करून ठेवला आहे. खुल्या बाजारपेठेत सध्या सोयाबीनला प्रतिक्विंटल ५ हजार दोनशे ते तीनशे रुपये दर मिळत आहे. दर वाढत नसल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला असून शेतकऱ्यांचे आर्थिक धोरण कोलमडले आहे. (Economy of farmers in Niphad taluka collapsed Problem is that prices are not increasing week half price of soybeans does not end Nashik News)

हेही वाचा: Crime News : 13 वर्षाच्या मुलाचा 6 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्काराचा प्रयत्न; विरोध करताच डोक्यात घातली वीट

सोयाबीन पिकाला २०२१-२२ मध्ये चांगला दर मिळाल्याने तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचा यंदा सोयाबीन पेरणीकडे कल वाढला. सोयाबीनला चांगला भाव मिळेल, या आशेवर शेतकरी होते. परंतु दिवसागणिक दर कोसळत असल्याने शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका सद्या चुकला आहे.

गेल्या वर्षीचा विचार केला तर सोयाबीन कधी नव्हे एवढा उच्चांकी दर प्रति क्विंटल सात ते आठ हजार रुपये मिळाला होता. आणखीन दरात वाढ होईल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी तसेच सोयाबीन साठवणूक करून ठेवले मात्र, दर काही वाढले नाहीत. यावर्षी देखील तीच अपेक्षा शेतकरी बांधवांना काढले नाही. प्राथमिक अंदाजानुसार असल्यामुळे गेल्यावर्षी चे आणि ६० टक्के शेतकऱ्यांचे सोयाबीन अजून देखील घरातच आहे.

प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

हेही वाचा: SPORTS News : ‘खेलो इंडिया गेम’ मध्ये संस्कृती करणार राज्याचे प्रतिनिधित्व

शेतकरी संकटात

गेल्या वर्षी सोयाबीनला प्रतिक्विंटल साडेसात ते आठ हजार रुपयांपर्यंतचा दर मिळाला होता. त्या तुलनेत आत्ताची स्थिती पाहिली तर तब्बल ५००० ते ५३०० रुपये क्विंटलवर येऊन पोहोचला आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. मागच्या वर्षी जो काही चांगला भाव मिळाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचा काहीसा कल हा भाव वाढीच्या दिशेने होता. परंतु ही अपेक्षा अंदाज फोल ठरताना दिसून येत आहे. पालखेड मिरचीचे(ता.निफाड) सप्टेंबर २०२२ पासून सोयाबीनचे दर स्थिर आहेत.

हेही वाचा: Sports News : बाळासाहेब ठाकरे कबड्डी करंडक स्पर्धेचे आज अंतिम सामने