esakal | भाजप आणि केंद्राच्या विरोधात सातत्याने बोलणाऱ्यांवरच ED ची कारवाई - भुजबळ
sakal

बोलून बातमी शोधा

bhujbal 12345.jpg

विरोधीपक्षातील एखादा नेता जो  व्यक्ती केंद्र सरकारच्या विरोधात जास्त बोलेल त्याला ईडीची भीती दाखवली जात आहे. मी बोललो म्हणून माझ्यावर केसेस दाखल केल्या. पवार साहेब निवडणुकीच्या काळात बोलले तर त्यांना नोटीस पाठवली जात आहे. त्यामुळे सुडापोटी ही कारवाई केली जात असल्याचे मत देखील छगन भुजबळ यांनी व्यक्त केले

भाजप आणि केंद्राच्या विरोधात सातत्याने बोलणाऱ्यांवरच ED ची कारवाई - भुजबळ

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल असे मत राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. भाजपाकडून सातत्याने सरकार पडण्याच्या वक्तव्याचा अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी चांगलाच समाचार घेतला. जे स्वप्नरंजन करुन घेत असेल आणि त्यात त्यांना आनंद मिळत असेल तर त्यांचा आनंद आपण का भंग करावा भाजपाला सरकार पडण्याची स्वप्ने पडत असतील तर त्यांनी जरूर स्वप्ने पहावी असा टोला देखील भुजबळ यांनी लगावला आहे.  

सरनाईक यांच्या विरुद्ध ईडीची सुडापोटी कारवाई

आमदार प्रताप सरनाईक यांच्या विरुद्ध ईडी सुडापोटी कारवाई करत असल्याची टीका देखील भुजबळ यांनी या वेळी केली.. प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीचा छापा पडल्याचे वृत्त मी पाहिले आहे. सरनाईक हे सातत्याने कंगना आणि अर्णबच्या प्रकरणात महाराष्ट्राच्या बाजूने बोलत होते म्हणूनच त्यांच्यावर ईडी कडून छापा टाकला गेला असल्याचे मत भुजबळ यांनी व्यक्त केले. 

हेही वाचा - क्रूर नियती! नातेवाईकांसोबत गणेशचे ते फोटो सेशन ठरले शेवटचे; घटनेने परिसरात हळहळ

मी बोललो म्हणून माझ्यावर केसेस दाखल

विरोधीपक्षातील एखादा नेता जो  व्यक्ती केंद्र सरकारच्या विरोधात जास्त बोलेल त्याला ईडीची भीती दाखवली जात आहे. मी बोललो म्हणून माझ्यावर केसेस दाखल केल्या. पवार साहेब निवडणुकीच्या काळात बोलले तर त्यांना नोटीस पाठवली जात आहे. त्यामुळे सुडापोटी ही कारवाई केली जात असल्याचे मत देखील छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. आज राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात जनता दरबार कार्यक्रमावेळी ते बोलत होते.

हेही वाचा - खेळ कुणाला दैवाचा कळला! लेकराचं तोंड बघायच्या आधीच वडिल देवाला प्रिय; गावात भयाण शांतता

loading image