नाशिक- बारावीचा निकाल जाहीर होऊन महिना उलटला, तरी तंत्रशिक्षण संचालनालयाने औषध निर्माणशास्त्र शाखेतील पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू केलेली नाही. दुसरीकडे महाविद्यालयांचे रॅकिंग व रेटिंगसंदर्भात फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाने परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकामुळे यंदाही औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया बारगळणार असल्याची शक्यता शैक्षणिक वर्तुळातून वर्तविली जात आहे.