नाशिक - आयआयटीमध्ये प्रवेश मिळविण्याच्या स्वप्नाकडे वाटचाल करताना विद्यार्थी रविवारी (ता. १८) जेईई ॲडव्हान्स परीक्षेला सामोरे गेले. शहरातील आठ परीक्षा केंद्रांवर सुमारे तीन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. पेपर दोनमधील गणित व भौतिकशास्त्र विषयाच्या प्रश्नांची काठीण्य पातळी अधिक राहिल्याने वेळेत सर्व प्रश्न सोडविताना कस लागल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली. २ जूनला परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे.