
नाशिक : महाविकास आघाडी सरकारमध्ये फूट पडण्यापूर्वी आमदार, नगरसेवकांपुरते मर्यादित राहणारे शिवसेनेचे संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी आता फुटीची लाट स्थानिक पातळीवर आल्यानंतर आता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आपलेसे करण्याचा प्रयत्न करताना बैठका बोलावत असल्याने बैठका व भ्रमणध्वनीवर त्यांना शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. (Efforts of contact chief bhausaheb chaudhari to recover fall of shivsena anger from Shiv Sainiks Nashik Political News)
राज्यात शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेला संघटनात्मक पातळीवर जर्जर करण्याचे काम उघडपणे शिंदे गटाकडून होत आहे. तर भाजपकडून पडद्यामागून शिवसेनेला डिवचले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यानंतर सुरवातीला पालकमंत्री दादा भुसे व नांदगावचे आमदार सुहास कांदे त्यांच्या सोबत होते. दिल्लीत बारा खासदारांनी उद्धव ठाकरे यांच्याशी बंड पुकारल्यानंतर त्यात खासदार हेमंत गोडसे यांनीदेखील शिंदे सरकारची वाट धरली.
माजी नगरसेवक प्रवीण तिदमे व पंचायत समितीचे माजी सभापती अनिल ढिकले वगळता शिंदे गटाला शिवसेना फोडण्यात फारसे यश हाती लागले नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवर पक्षाचे वजन वाढत नसल्याने जनमानसात प्रतिमा उंचावण्यासाठी मोठ्या फळीची आवश्यकता होती. मागील आठवड्यात तेरा माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गटात प्रवेश केल्याने शिवसेनेसाठी तो मोठा धक्का मानला गेला.
संघटनात्मक पातळीवर पडझड झाल्याने सावरण्यासाठी आता संपर्कप्रमुखांचे प्रयत्न सुरू झाले आहे. विधानसभा अध्यक्ष, विभाग प्रमुखांच्या बैठका बोलविल्या जात आहे. त्यात निष्ठेचे धडे ऐकविले जात आहेत.
हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...
तेव्हा कुठे होतात?
पक्षाला सुगीचे दिवस होते. त्या वेळी संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी फक्त प्रमुख पदाधिकारी, नगरसेवकांच्या गराड्यात राहायचे. संघटनेच्या एकाही पदाधिकाऱ्याला भेटले नाही, त्यांच्याशी संपर्क साधला नाही.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची नावेदेखील त्यांना माहीत नाही. चांदवड विधानसभा मतदारसंघ निवडणुकीच्या दृष्टीने भक्कम करण्यासाठी फक्त त्या भागातील पदाधिकाऱ्यांना त्यांनी हाताशी धरले. पक्षात बाहेरून आलेल्यांना पदे देवून त्यांना मोठे केले. सामान्य शिवसैनिक आहे तेथेच आहे. आता, मात्र चौधरी यांना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची आठवण येत आहे. तेव्हा कुठे होतात, असा सवाल करत मनातले शल्य बोलून दाखविले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.