Dhananjay Bele and 'Nima' officials welcoming Vishwas Pathak, Director of Mahavitaran Company.
Dhananjay Bele and 'Nima' officials welcoming Vishwas Pathak, Director of Mahavitaran Company.esakal

Nashik News: नाशिकमध्ये लवकरच EHV 400 KV उपकेंद्र

Published on

Nashik News : ‘निमा’ पदाधिकाऱ्यांनी महावितरण कंपनी संचालक विश्वास पाठक यांच्याबरोबर बैठक घेत विविध समस्यांवर चर्चा केली. या वेळी पाठक यांनी संबंधितांना त्वरित समस्या सोडविण्याच्या सूचना दिल्या. (EHV 400 KV Substation soon in Nashik News)

तसेच, नजीकच्या काळात मागणीनुसार नाशिकमध्ये लवकरच इएचव्ही ४०० केव्ही क्षमतेचे महावितरण प्रणालीचे उपकेंद्र उभारण्यात येईल, असे आश्वासन दिले. ‘निमा’ अध्यक्ष धनंजय बेळे यांनी श्री. पाठक यांचे स्वागत केले.

पालखेड, लखमापूर, तळेगाव व परिसर तसेच इगतपुरी- वाडीवऱ्हे, गोंदे, अंबड, सिन्नर-माळेगाव, शिंदे-पळसे या औद्योगिक वसाहतींसाठी अतिरिक्त नवीन उपकेंद्रांचे प्रस्ताव अनेक दिवसांपासून ‘निमा’मार्फत देण्यात आलेले आहेत व ते प्रलंबित आहेत. तेही तातडीने कार्यान्वित करणे आवश्यक असल्याचे ‘निमा’ पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Dhananjay Bele and 'Nima' officials welcoming Vishwas Pathak, Director of Mahavitaran Company.
Abha Golden Card: आयुष्मान भारत गोल्डन कार्ड वितरणात राज्यात नाशिक अव्वल

विश्वास पाठक म्हणाले, की महाराष्ट्रासाठी एकूण ४२ हजार कोटींची योजना तयार केलेली असून, त्यापैकी १९ हजार कोटी नाशिक जिल्ह्यासाठी शासन देत आहे. त्यात प्राधान्याने औद्योगिक क्षेत्रासाठी लागणारा सुमारे ५०० कोटींचा निधी देऊन कोणत्याही प्रकारे निधी कमी पडू दिला जाणार नाही.

आरडीएसएसओ या स्कीमअंतर्गत तातडीने कार्यवाही करून मागणी केलेल्या सर्व उपकेंद्रांचे कार्य तातडीने सुरू होईल. या वेळी आयमा सल्लागार समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर गोपाळे, रवींद्र झोपे, मिलिंद राजपूत, राजेंद्र वडनेरे, मुख्य अभियंता संजीव भोळे व दीपक कुमठेकर, अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर आदी उपस्थित होते.

Dhananjay Bele and 'Nima' officials welcoming Vishwas Pathak, Director of Mahavitaran Company.
Thackeray Vs Shinde News: मालेगावात शिवसेना विरुद्ध शिवसेना संघर्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com