मालेगाव: शहरात ईद-ए-मिलाद जल्लोषात साजरा होणार आहे. येथे प्रेषित मोहम्मद पैगंबरांची १५०० वी जयंती साजरी होणार असल्याने शहरात उत्साहाचे वातावरण आहे. येथील चौकाचौकांमध्ये सजावटीचे साहित्य विक्रीची दुकाने थाटली आहेत. ५ सप्टेंबरला जुलूस (रॅली) काढण्यात येणार आहे.