esakal | येवल्यातील ८ केंद्रांना लसीचे २१०० डोस प्राप्त; केंद्रांवर लसीकरण पुन्हा सुरु

बोलून बातमी शोधा

corona vaccination
येवल्यातील ८ केंद्रांना लसीचे २१०० डोस प्राप्त; केंद्रांवर लसीकरण पुन्हा सुरु
sakal_logo
By
संतोष विंचू

येवला (जि. नाशिक) : गेले दोन दिवस लस संपली होती. सोमवारी (ता.२६) तालुक्यासाठी २१०० लसीचे डोस प्राप्त झाले असून, नव्याने राजापूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांतही लसीकरण केले जाणार आहे.

सोमवारी तालुक्यातील अंदरसूल, भारम, सावरगाव, पाटोदा, मुखेड व राजापूर या प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी प्रत्येकी ३०० डोस तर शहरातील उपजिल्हा रुग्णालयासाठी २०० तर शहरातील साई सिद्धी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी १०० असे एकूण २१०० लसीचे डोस उपलब्ध झाल्याने प्रत्येक केंद्रावर पुन्हा लसीकरण सुरु आले. तालुक्यातील राजापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर लसीकरण सुरु करण्याच्या परिसरातील नागरिकांच्या मागणीची दखल घेण्यात आली असून, या केंद्रासाठी देखील २०० डोस प्राप्त आहेत. राजापूर येथील नव्याने सुरु होणारे हे लसीकरण केंद्र मंगळवार (दि.२७) पासून सुरु होणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी शरद कातकाडे यांनी दिली. दरम्यान, तालुक्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपजिल्हा रुग्णालयातील केंद्रावर लसीकरणासाठी होणारी नागरिकांची गर्दी लक्षात घेता प्राप्त झालेले लसीचे डोस कमी पडणार आहेत. त्यामुळे लसींचा साठा वाढवून देण्याची मागणी होत आहे.

हेही वाचा: मुले असूनही ती ठरली बेवारस! ओझरकरांनी माणुसकी दाखवत केले अंत्यसंस्कार