Nashik Crime News : वडाळा गावातून साडेआठ किलो गांजा जप्त; ट्रॅव्हल्स बसमधून 2 लाखांचा गांजा पकडला

Crime news
Crime newsesakal

Nashik Crime News : वडाळागावात अमलीपदार्थांची सर्रास विक्री होत असल्याच नेहमीच बोलले जाते, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. इंदिरानगर पोलिसांनी छापा टाकून एकाच्या घरातून सुमारे एक लाखांचा साडेआठ किलो गांजा जप्त केला आहे.

तर मुंबई नाका पोलिसांनी ट्रॅव्हल्समधून सुमारे ६२ किलो गांजा बेकायदेशीर वाहतूक केली जात असताना जप्त केला असून, दोघांना अटक केली.

या दोन्ही घटनांमुळे शहरातील अमलीपदार्थांची विक्री होत असल्याची बाब अधोरेखित झाली असून, या तस्करांची पाळेमुळे खणून काढण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. (Eight kilos of ganja seized from Wadala village Ganja worth 2 lakh seized from travel bus Nashik Crime News)

रविवारी (ता. ३०) पहाटे पोलिसांनी अचानक कोंबिंग ऑपरेशन राबविले. वरिष्ठ निरीक्षक गणेश न्यायदे यांना वडाळा गावात म्हाडाच्या वसाहतींच्या मागे नसरीन शेख यांच्या घराजवळ अमलीपदार्थ विक्री केली जात असल्याची खबर मिळाली होती.

त्यानुसार, न्यायदे यांच्यासह उपनिरीक्षक सुवासिनी बारेला, लक्ष्मण बोराडे, सागर परदेशी, योगेश जाधव, युवराज पाटील, अमजद पटेल, वसंत ढगे यांच्या पथकाने छापा टाकला. घराबाहेर उभ्या असलेला इम्तियाज उमर शेख (३०) यास घराचे कुलूप उघडण्यास सांगितले असता, त्याने चावी नसल्याचे सांगितले.

पोलिसांनी कडीकोयंडा तोडून घराची झडती घेतली. एका कापडी पिशवी ८ किलो ५४६ किलो वजनाचा गांजा हाती लागला. या गांजाची किंमत सुमारे एक लाख २ हजार ५२५ रुपये आहे. याप्रकरणी संशयित इम्तियाज उमर शेख यास अटक केली असून, इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Crime news
Crime News : पोलिसालाच डांबून गोवंश तस्करांनी ठोकली धूम

सदर गुन्ह्याचा तपास महिला उपनिरीक्षक सुवासिनी बारेला करीत आहेत. दरम्यान, मायलन सर्कलजवळ एका ट्रॅव्हल्स बसमधून गांजाची बेकायदा वाहतूक केली जात असल्याची खबर मुंबई नाका पोलिसांना मिळाली. त्यानुसार, निरीक्षक चंद्रकांत अहिरे यांनी पथकाद्वारे ट्रॅव्हल्सची तपासणी केली असता, ६ लाख ६२ हजारांचा ६२ किलो गांजा हाती लागला.

संशयित रोहित सुधाकर तुपे (२६), संतोष महादेव भुरे (२८, दोघे रा. मालाड), आकाश (२२), श्रावण (२५), अक्षय (२८) यांच्याविरुद्ध मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, संशयित तुपे, भुरे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

Crime news
Crime News : फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये उझबेकिस्तानसह दिल्लीच्या तरुणींकडून देहव्यापार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com