नाशकातील संमेलनात भाजप नेत्यांची गर्दी; 'एकनाथ' मात्र एकाकी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Khadase

नाशकातील संमेलनात भाजप नेत्यांची गर्दी; 'एकनाथ' मात्र एकाकी

Eknath Khadse : नाशिक येथील महानुभव पंथाच्या संमेलनात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे एकाच मंचावर उपस्थित होते. मात्र, मंचावर भाजप नेत्यांच्या गर्दीत एकनाथ खडसे एकाकी पडल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. त्यामुळे संमेलन सभारंभाच्या मंचावर असून खडसे दूरच असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा: Raj Thackeray : बावनकुळेंनी घेतली 'राज' भेट; युतीबाबत केलं महत्त्वाचं विधान

नाशिकमध्ये तीन दिवसीय महानुभव पंथाच्या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला गिरीश महाजन, देवेंद्र फडणवीस उपस्थित आहे. मात्र, असे असतानदेखील महाजन आणि फडणवीस यांच्यापासून खडसेंनी काहीसे अंतर ठेवल्याचे दिसून आले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. संमेलन सुरू झाल्यानंतर अनेक कार्यक्रम पार पडले मात्र, खडसे कार्यक्रमाला आल्यापासून ज्या खूर्चीवर बसूव आहेत तेथेच आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक दीनकर पाटील भजपाचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी केले आहे.

हेही वाचा: शिंदे, फडणवीस आता आरक्षण घालविल्याचे ढोल का बडवित नाहीत? एकनाथ खडसे

खडसे आणि फडणवीस यांच्यातील राजकीय नाते अनेक काळ राज्यात चर्चेचा विषय राहिलेला आहे. कदाचित त्याचेच काहीसे पडसाद नाशिक येथील मंचावर पाहण्यास मिळत आहे असे म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही.

Web Title: Eknath Khadase Alon In Nashik Mahanubhavpanth Samelan

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..