Raj Thackeray : बावनकुळेंनी घेतली 'राज' भेट; युतीबाबत केलं महत्त्वाचं विधान

Raj Thackeray Bawankule
Raj Thackeray Bawankule Sakal

Chadrashekhar Bawankule Meet Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि भाजप नेत्यांच्या गाठीभेटी गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. नुकतीच राज ठाकरे यांची भाजप नेते विनोद तावडे यांनी भेट घेतली होती. त्यानंतर आज भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. आपण राज यांची केवळ सदिच्चा भेट घेतली असून, उद्यापासून गणेशोत्सवदेखील आहे त्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. बावनकुळे यांनी राज यांची भेट घेतल्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. मात्र, ही भेट सदिच्छा भेट होती यामध्ये कोणतेही राजकीय समीकरण नाही असे, स्पष्टीकरण बावनकुळे यांनी दिले आहे.

Raj Thackeray Bawankule
"राज ठाकरे फायटर नेते"; बावनकुळेंकडून कौतुकाचा वर्षाव

बावनकुळे म्हणाले की, राज ठाकरे हे मोठ्या भावासारखे असून, ते नेहमी माझ्या कौटुंबिक कार्यक्रमांना हजेरी लावतात. राज आणि आमचे वैचारीक साम्यदेखील आहे. वैचारिक युती होणार का? प्रश्नावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, राज ठाकरे नेहमी हिंदुत्वाची बाजू मांडत आले आहेत. तसेच रक्षण करत आले आहेत. त्यामुळे त्यांची भेट घेणं गैर नाही.

युतीचा निर्णय केंद्रातून

मनसे युतीचा निर्णय केंद्रातील वरिष्ठ नेते अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि देवेंद्र फडणवीस आदी घेतात. त्यामुळे मनसे युतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवरूनच घेतला जाईल असे स्पष्टीकरण बावनकुळेंनी दिले आहे. माझं, काम केवळ पक्ष कसा वाढेल आणि त्यासाठी काय काय करता येईल हे करणे आहे. त्यामुळे युती करणे भविष्यात काय रणनीती असेल याचा सर्वस्वी निर्णय वरिष्ठ नेते घेतील.

Raj Thackeray Bawankule
Supreme Court : बाबरी विध्वंस अन् गुजरात दंगलीबाबत SC चा मोठा निर्णय

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सागर बंगल्यात भेट झाल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर अनेक चर्चांना उधाण आले होते. मात्र, अशी कोणतीही भेट झाली नसल्याचे स्पष्टीकरण दोन्ही नेत्यांकडून देण्यात आले होते. त्यानंतर आज लगचेच भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी राज यांची भेट घेतली. त्यामुळे अनेक राजकीय चर्चांना उधाण आले होते. मात्र, ही सदिच्छा भेट होती असे म्हणत युतीचा निर्णय केंद्रातील वरीष्ठ नेते घेतील असे बावनकुळेंनी सांगितल्याने सुरू असलेल्या चर्चांना काहीसा पुर्णविराम मिळाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com