Eknath Khadse
sakal
नाशिक: महाराष्ट्रात अलीकडे जाती-जातींमध्ये संघर्षाचे वातावरण तयार झाले. राज्याचे सामाजिक आरोग्य त्यामुळे बिघडत आहे. आरक्षणावरून सरकारने वेळेत भूमिका स्पष्ट केली असती तर जाती-जातींमध्ये वैमनस्य निर्माण झाले नसते, असे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी येथे सांगितले. सरकारची भूमिका जातीव्यवस्थेत फूट पाडणारी असून, ती न शोभणारी आहे, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.