३२२२२
नाशिक : मुख्य निवडणुक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा व विविध मागण्यांसाठी मंगळवारी आंदोलन करताना ज्येष्ठ नागरिक.
ज्ञानेश कुमारांविरोधात
ज्येष्ठ नागरिकांचे आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १३ : देशाचे मुख्य निवडणुक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी शहरातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येत मंगळवारी (ता.१३) शिवाजी रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केले. यावेळी मतदार यादी विशेष पुर्नरीक्षण कार्यक्रम रद्द करताना देशात निवडणूका मतपत्रिकेवर घ्याव्या, अशी मागणी केली.
त्यानंतर जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनानुसार भारतीय लोकशाही ही संविधानाने दिलेल्या सार्वत्रिक मताधिकारावर तसेच नागरिकांच्या स्वतंत्र व निर्भय मतदानाच्या अधिकारावर आधारलेली आहे. निवडणूक प्रक्रियेबाबत जनतेत विश्वास कायम राखताना पात्र मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यासाठी निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता असणे महत्वाचे आहे. ही बाब लक्षात घेता आयुक्त कुमार यांचा तातडीने राजीनामा घ्यावा. तसेच विशेष मतदार मोहिम रद्द करावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली.
निवेदनावर शांताराम चव्हाण, करुणासागर पगारे, शकुंतला जायभावे, कुमार औरंगाबादकर, मुकुंद दिक्षीत, बाबा देशपांडे, प्रभाकर धात्रक, प्रल्हाद नेहेते. रेखा जाधव यांच्यासह इतर ज्येष्ठांच्या स्वाक्षऱ्या आहेत.