Latest Marathi News | बँकांमध्ये ज्येष्ठांचा सन्मान हरविला; कामकाजाबाबत ज्येष्ठ नागरिकांची नाराजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Old Age People in bank

Nashik News : बँकांमध्ये ज्येष्ठांचा सन्मान हरविला; कामकाजाबाबत ज्येष्ठ नागरिकांची नाराजी

कळवण (जि. नाशिक) : ज्येष्ठ नागरिक किंवा निराधार मंडळी तासन्तास बँकेच्या रांगेत उभी राहूनही त्यांची कामे होत नाहीत. छोट्याशा समस्येसाठी त्यांना दुसऱ्या दिवशी परत बोलविले जाते. त्यांनी कुठल्याही बाबीची विचारणा केल्यास उद्धटपणे उत्तर दिले जाते. त्यामुळे कळवण तालुक्यातील व शहरातील बँकांमध्ये ज्येष्ठांचा सन्मान हरविल्याचे दिसून येत आहे. (Elders lost respect in banks Discontent of senior citizens regarding work of bank nashik Latest Marathi News)

घर असो वा समाज, जीवनात प्रत्येकजण वडीलधारी, ज्येष्ठ गुरुजन व ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करतो. त्यांना मदत लागल्यास धावून जातो. आयुष्याचा उतारवयात हातपायांना कंप सुटतो. अशावेळी ज्येष्ठांना आधाराची खरी गरज असते. मात्र, समाजात बरेच ज्येष्ठ नागरिक असे आहेत की, ज्यांना कुणाचाही आधार नसतो. बँकेत दरमहा जमा होणाऱ्या मानधनावर त्यांच्या उदरनिर्वाह चालतो. तर नोकरदार मंडळींना मिळणाऱ्या पेन्शनवर खर्च भागवावी लागतो. मात्र, ही रक्कम बँकेत जमा होत असल्याने या मंडळींना बँकांत जावे लागते.

मात्र, बँकांत लांबच लांब रांगा लागतात. कधी इंटरनेट खंडित तर कधी लंच ब्रेकचा धडाका असतो. त्यामुळे ज्येष्ठ मंडळींच्या छोट्याशा कामाकरिता त्यांना तासन्तास रांगेत ताटकळत उभे राहावे लागते. रांगेत उभे राहून ज्येष्ठ मंडळींचे हाल बेहाल होतात. साधे पासबुकवर व्यवहाराची माहितीसुद्धा प्रिन्ट करून दिली जात नाही. छोट्या कामाकरिता दुसऱ्या दिवशी बोलविले जाते. काही विचारणा केल्यास उद्धटपणाची भाषा वापरतात. त्यामुळे बँकांच्या चुकीच्या धोरणामुळे ज्येष्ठांना अनेक त्रास सहन करावे लागत असल्याने बँकेच्या कामकाजाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा : शेतमजूर ते कॅनाॅल मॅन...जाणून घ्या एक यशोगाथा....

पिण्याच्या पाण्यासह शौचालयाचा अभाव

कळवण शहरासह तालुक्यातील बहुतांश बँकांमध्ये ग्राहकांना पिण्याच्या पाण्यासह शौचालयांचा अभाव आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची मोठी परवड होत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र्य | व्यवस्थेची मागणी ज्येष्ठ नागरिकांची असून, कामे वेळेत व विहित कालावधीत होण्यासाठी बँकांनी स्वतंत्र्य व्यवस्था करावी, अशी मागणीही ज्येष्ठ नागरिकांकडून होत आहे.

"निराधार व ज्येष्ठ मंडळींना बँकेत रांगेत ताटकळत उभे ठेवण्यात येऊ नये शिवाय कर्मचारी वर्गाने ज्येष्ठांच्या अवमान होईल असं वागू नये. बँकेत ग्राहकांनी ज्येष्ठ च्या सन्मान करून त्यांना प्राधान्य द्यावे." - के.एम.पगार, उपाध्यक्ष, सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघ

टॅग्स :BankNashikold age people