
Nashik Crime News : धान्य वितरण व्यवस्थेतील धान्यसाठा जप्त; ग्रामीण पोलीसांची कारवाई
नाशिक : नाशिक - कळवण - देवळा रोडवर प्रभात स्टीलचे बाजुला असलेल्या गोडावुन मध्ये शासनाने रेशनवर उपलब्ध करून दिलेल्या तांदळाचा साठा खुल्या बाजारात विक्री करण्यासाठी ठेवला असल्याची माहिती पोलीसांना मिळाल्याने जोगेश्वरी या गोडावूनवर छापा टाकून अजय मधुकर मालपुरे, (52) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. (confiscation of grain stalks in grain distribution system Rural police action Nashik Latest Crime News)
हेही वाचा : शेतमजूर ते कॅनाॅल मॅन...जाणून घ्या एक यशोगाथा....
शासनाने गोरगरीब जनतेस अल्पदरात उपलब्ध करून दिलेले सुमारे 19.40 टन तांदुळ किंमत रुपये - 5 लाख 82 हजार तर 15.20 टन गहू,3 लाख 80 हजार रुपये, घटनास्थळावर मिळालेली संशयीत वाहने असा 24 लाख 62 हजार रूपयाचा मुददेमाल खुल्याबाजारात विक्री व वाहतूक करण्याचे उद्देशाने साठा करतांना मिळून आल्याने त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपीस कळवण न्यायालयात उभे केले असता जामीनावर मुक्तता करण्यात आली. सदर गुन्हयाचा पुढील तपास कळवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांचे पथक करीत आहे.