Nashik News: थंडीत वीज वितरण कंपनीचा शेतीला ‘शॉक'! रात्री पावणेअकरा ते सकाळी पावणेसातपर्यंत वीजपुरवठा

Electricity distribution company shock to agriculture in winter Electricity supply from eleven at night to seven in morning Nashik
Electricity distribution company shock to agriculture in winter Electricity supply from eleven at night to seven in morning Nashikesakal

नामपूर : कांद्याच्या निर्यातबंदीने निम्म्याने घसरलेले बाजारभाव, खरी हंगामातील दुष्काळ, भांडवली खर्चात झालेली प्रचंड वाढ, विजेचा अनियमित पुरवठा आदी बाबींमुळे शेतकऱ्यांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

त्यातच, वीज वितरण कंपनीच्या कारभाराची भर पडल्याने शेतकऱ्यांना ऐन कडाक्याच्या थंडीत पिकांना पाणी द्यावे लागत आहे.

शेतीसाठी दिवसा होणाऱ्या भारनियमनामुळे रात्री पावणेअकरा ते सकाळी पावणेसात यावेळेत वीजपुरवठा करण्यात येत असल्याने वीज कंपनीने शेतीला थंडीत ‘शॉक' दिला आहे. (Electricity distribution company shock to agriculture in winter Electricity supply from eleven at night to seven in morning Nashik News)

गेल्या आठवड्यापासून उत्तर भारतात हिमवर्षाव होत असल्याने परिसरात तापमानाचा पारा खालावला असून १० ते १२ अंश सेल्सिअसपर्यंत किमान तापमानाची नोंद होत आहे. थंडीची लाट रब्बीच्या पिकांना पोषक असली, तरी वीज वितरण कंपनीच्या कारभारामुळे रात्रभर हुडहुडी भरविणाऱ्या कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांना शेतात राबावे लागत आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. रब्बी हंगामात शेतकऱ्यांना आठवड्यात तीन ते चार दिवस रात्रभर जागून पिकांना पाणी द्यावे लागत आहे. तसेच १४ ते १६ तास अंधारात राहावे लागत आहे. वीज कंपनीच्या शेतकरीविरोधी पद्धतीमुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

वीज कंपनीचे उपविभागीय अधिकाऱ्यांनी यांनी लक्ष घालून भारनियमनाची वेळ बदलावी, शेती सिंचनासाठी दिवसभर बारा तास वीजपुरवठा करावा, अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेंद्र कापडणीस यांनी केली आहे.

आठवड्यातील काही दिवस दिवसा वीजपुरवठा होत असला, तरी वारंवार खंडीत होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे पिकांना पाणी देणे शक्य होत नाही.

अशातच, पुन्हा एकदा महावितरणने रात्रभर सिंचनासाठी वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांपुढील अडचणी वाढविल्या आहेत. वीज वितरण कंपनीचा निर्णय शेतकऱ्यांना अन्यायकारक आहे.

आठवड्यात तीन दिवस दिवस वीजपुरवठा असतो, तर चार दिवस रात्रीचा असतो. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या सिंचनासाठी त्रास सोसावा लागतो.

Electricity distribution company shock to agriculture in winter Electricity supply from eleven at night to seven in morning Nashik
SAKAL Exclusive: माध्यान्ह भोजन योजनेत अंडी वाटपासाठी अनुदान अपुरे! थंडीमुळे भाव झालेत ‘गरम'

खरिपाच्या पिकांवर सोडले पाणी

मोसम खोऱ्यासह बागलाण तालुक्यात पावसाअभावी उद्‍भवलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे खरिपाच्या पिकांवर पाणी सोडावे लागले. त्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थचक्र कोलमडून पडले आहे.

केंद्र सरकारने कांद्याची मार्च २०२४ पर्यंत निर्यातबंदी करण्याची घोषणा केल्याने उन्हाळ कांद्यासह लाल कांद्याचे दर निम्म्याने घसरले आहेत. भाव पडल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघाला नाही.

मातीमोल भावाने कांद्याची विक्री केल्याने शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. उन्हाळ, लाल कांद्याची झळ आणि वाया गेलेला खरीप हंगाम यामुळे ‘दुष्काळात तेरावा महिना' अशी शेतकऱ्यांची गत झाली आहे.

आगामी काळात कांद्याला भाव मिळेल, या अपेक्षेने परिसरात मोठ्या प्रमाणात उन्हाळ कांद्याची लागवड सुरू आहे.

मजुरीत भरमसाठ वाढ झाल्याने कांदा लागवडीसाठी एकरी ५० ते ६० हजार रुपये खर्च करावा लागत असल्याचे कांदा उत्पादक संजय सावंत यांनी ‘सकाळ'ला सांगितले.

"मोसम खोऱ्यात सध्या कडाक्याच्या थंडी आहे. त्यात, रात्रीचा वीजपुरवठा होत असल्याने हिंस्र श्‍वापदे, विंचू, साप, चोर अशा अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. फिडरनिहाय काहींना दिवसा, तर काहींना रात्री वीज मिळत आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांच्या अडचणींचा विचार करून रात्रीपेक्षा दिवसा विनाखंड अधिक वेळ वीज द्यावी."

-प्रवीण अहिरे, जिल्हाध्यक्ष स्वतंत्र भारत पक्ष

Electricity distribution company shock to agriculture in winter Electricity supply from eleven at night to seven in morning Nashik
Nashik News: नांदगावकर वाढत्या वाहतुकीमुळे प्रदूषणाच्या विळख्यात! महामार्ग प्राधिकरणासह पोलिसांना निघेना तोडगा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com