VIDEO : "मम्मा ऐकते का..कधी येणार मम्मा" चिमुरडीची डॉक्टर आईला आर्त साद!

shubhangi ahire.png
shubhangi ahire.png

नाशिक /मालेगाव : मालेगावातील वाढती रुग्णसंख्या जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागासाठी चिंतेची बाब ठरत आहे. ज्यामुळे शहरात चिंतेचे वातवरण आहे. अशातच मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टर शुभांगी अहिरे यांनी मालेगावच्या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी सुरू असलेले काम व आपल्या मुलांपासून तसेच घरापासून दूर राहून कर्तव्य बजावत असलेला एक भावनिक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे

"मालेगावची सुरुवातच पाचच्या पाढ्याने झाली" डॉ अहिरे यांनी व्यक्त केल्या भावना

"नमस्कार मी डॉक्टर शुभांगी सुमित अहिरे कान नाक घसा तद्न्य  सामान्य रुग्णालय मालेगाव. 8 एप्रिल रोजी मालेगावात पहिल्या पाच करोना बाधित रुग्णांचा अहवाल प्राप्त झाला, तेव्हापासुन उडालेली झोप अजुनही उडालेलीच आहे. आपल्या मालेगावची सुरुवातच पाचच्या पाढ्याने झाली. कोरोनासाठी isolation ward सामान्य रुग्णालयात महिनाभरा पुर्वीच तयार होता.
Patients  चे screening चालुच होते. पण जेव्हा रुग्ण positive येतील तेव्हा घरी जाता येणार नाही, यासाठी मनाची तयारी करुनच ठेवली होती.

आम्हाला घरी बसुन चालणार नव्हते - डॉ. अहिरे

बाहेर सामान्य जनतेस कोरोनाची प्रचंड़ भिती होती आणि आहे. म्हणून आम्हाला घरी बसुन चालणार नव्हते. सामान्य रुग्णालयातील आम्ही सगळेच डॉक्टर्स, कर्मचारी ,staff नर्सेस तत्परतेने war against corona साठी सरसावलो. येणारे संशयित रुग्ण,बाधित रुग्ण,त्यांच्या तपासण्या, contact tracing सगळच युद्ध पातळी वर चालु झालं. PPE kits घालुन अतिशय अवघड परीस्थितीत राहून सगळयांनीच भारावल्या सारखं काम केलं.
त्यातुन treatment ला प्रतिसाद देणारे रूग्ण बघितले,रात्री अपरात्री अत्यावस्थ होणारे रुग्ण बघितले, मृत्यच तांडव, नातेवाईकांचा आक्रोश, डॉक्टरांवर होणारा हल्ला सगळं जवळून अनुभवलं.

हे दुष्टचक्र कधी थांबेल याबाबत तुर्तास तरी अनिश्चितताच..

कुटुंबाला,मुलांना सोडुन दिवसरात्र झपाटल्यासारखं  काम केलं.आणि जेव्हा पहिले 7 रुग्ण पूर्णपणे बरे होऊन डिस्चार्ज झाले. तेव्हा या सगळ्या कामाचा शीण कुठल्या कुठे निघुन गेला. आपल्या सगळ्या मेहनतीच चीज झालय अस वाटलं..सध्या आम्ही डॉक्टर्स corona सदृश लक्षणे असल्याने व सतत बाधित रुग्नांच्या संपर्कात आल्याने अजुन ही घरापासुन लांबच आहोत. Social distancing पाळत आणि कोरोनाच्या संक्रमणास आळा घालण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा कामावर रुजू होणेच आहे.पुन्हा रुग्नांशी संपर्क येणार आहेच . हे दुष्टचक्र कधी थांबेल याबाबत तुर्त तरी अनिश्चितताच..

कुटुंबाचा खंबीर पाठिंबा..म्हणून

"अजूनही मुलांची भेट नाही आणि ती किती काळासाठी होणार नाही, हे ही माहित नाही . कुटुंबाचा खंबीर पाठिंबा असल्या कारणाने हे सगळ सोसण्याच बळ मिळतय...Video call वर जरी बोलत असलो तरी मुलाना प्रत्यक्ष न भेटता येण्याचं दु:ख हे आईशिवाय कुणीच समजु शकत नाही. ही अशी परिस्थिती कुणावरच येऊ नये अशी प्रार्थना करेन आणि पुन्हा एकदा समस्त मालेगावकराना कळकळीची विनंती करेन आज 162 वर पोहोचलो आहोत अजुनही लढा द्यायचा आहे आणि या परिस्थितीवर मात करून जिंकायचय.."

प्रशासन आपली पुर्ण काळजी घेतय. आपण आमच्यासाठी फक्त घरी नाही थांबू शकणार का ? कारण आपण घरी थांबलात तरच  आम्हालाही घरी जाता येईल..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com