esakal | कौतुकास्पद! कसोटीच्या काळात मिळवून दिला रोजगार; गावात पेटल्या १०० चुली

बोलून बातमी शोधा

tribal
कौतुकास्पद! कसोटीच्या काळात मिळवून दिला रोजगार; गावात पेटल्या १०० चुली
sakal_logo
By
टीम ई सकाळ

नाशिक : कोविडच्या दुसऱ्या लाटेत सुरू झालेल्या लॉकडाउनचा सामना कसा करण्यासाठी संपूर्ण भारत देश पेचात आहे. यापासून आदिवासी पाडे देखील त्रस्त आहेत. अशातच पेठ तालुक्यातील शेवखंडी गावातील नागरिकांना आशेचा किरण मिळाला आहे.

गावातील शंभर चुली पेटवण्याचे मोठे काम

पेठ तालुक्यातील आदिवासी तरुणांची धडपडीचे सध्या कौतुक होताना दिसत आहे. सोशल नेटवर्किंग फोरम या सामाजिक संस्थेने पेठ तालुक्यातील शेवखंडी हे गाव दत्तक घेतले आहे. सर्वांच्या सहकार्याने व शासनाच्या मदतीने गावातील १०० ग्रामस्थांना रोजगार उपलब्ध झाला असून, गावातील शंभर चुली पेटवण्याचे मोठे काम या तरुणांनी करून दाखवले आहे.

हेही वाचा: असे घडले मृत्यूतांडव! नाशिक ऑक्सिजन गळतीची घटना cctv मध्ये कैद; पाहा VIDEO

तरुणांच्या धडपडीतून आदिवासींच्या हातांना रोजगार

या गावातील तरुण कार्यकर्ते ज्ञानेश्वर गावित, कैलास भोये, पुष्कर चौधरी, गणेश भगरे, योगेश चौधरी, अरुण चौधरी यांनी बेरोजगारीच्या समस्येवर उपाय शोधायचे ठरवले. फोरमचे प्रमोद गायकवाड यांच्याशी चर्चा करून शासकीय पातळीवरून रोजगारासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. यासाठी सरपंच हरिभाऊ लहारे, ग्रामसेवक दुर्गादास बोसारे आणि सदस्य यांच्यासह ग्रामपंचायतनेही महत्त्वाची भूमिका निभावली.

हेही वाचा: कोरोनावर ‘गूळवेल’ ठरतेय अमृत! गुणकारी फायद्यांमुळे मोठी मागणी

पेठ तालुक्यातील शेवखंडी गाव घेतले दत्तक

कोवीडच्या कसोटीच्या काळात गावातील तरुण सामाजिक कार्यकर्त्यांनी परिसरातील शंभर माणसांना रोजगार मिळवून दिला आहे. घरापासून तर शासनापर्यंत सर्वच स्तरावर रोजच निराशेचे सूर कानी पडत आहेत. अशाही वातावरणात स्वत:चा आशावाद टिकवून इतरांच्या घरातील चूल पेटती रहावी, यासाठी गरीब कष्टकऱ्यांच्या पोटापाण्याची साधने हिरावली गेली आहेत. या स्थितीत आपल्या गावात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी झटणाऱ्या आमच्या तरुण सदस्यांचा फोरमला अभिमान आहे. असे नाशिकचे सोशल नेटवर्किंग फोरमचे संस्थापक प्रमोद गायकवाड यांनी सांगितले.