esakal | सप्‍टेंबरपासून प्रवेश परीक्षांचा होणार श्रीगणेशा! 'या' तारखांना होणार परिक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

students.jpg

राष्ट्रीय स्‍तरावरील अभियांत्रिकी इन्‍स्‍टिट्यूटमध्ये प्रवेशासाठी आवश्‍यक असलेल्‍या जेईई मेन्‍स परीक्षेकडे सर्वांचे लक्ष लागून होते. नॅशनल टेस्‍टींग एजन्‍सीतर्फे यापूर्वी जानेवारी महिन्‍यात जेईई मेन्‍स परीक्षा घेण्यात आली होती. यानंतर दुसऱ्यांना एप्रिलमध्ये परीक्षा नियोजित होती. परंतु कोरोनामुळे उद्भवलेल्‍या परिस्‍थितीत या परीक्षेला स्‍थगिती द्यावी लागली होती

सप्‍टेंबरपासून प्रवेश परीक्षांचा होणार श्रीगणेशा! 'या' तारखांना होणार परिक्षा

sakal_logo
By
अरुण मलाणी

नाशिक : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्‍याने प्रभावित झालेले शैक्षणिक क्षेत्र पूर्वपदावर येत आहे. सप्‍टेंबर महिन्‍यांत विविध अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी होणाऱ्या परीक्षांचा श्रीगणेशा होईल. १ ते ६ सप्‍टेंबर या कालावधीत जेईई मेन्‍स परीक्षा पार पडणार आहे. तर इग्‍नू, दिल्‍ली विद्यापीठासह अन्‍य विद्यापीठ, शिक्षणक्रमाच्‍या प्रवेश परीक्षा पुढील महिना भरात पार पडणार असल्‍याने प्रवेश प्रक्रियेला गती प्राप्त होणार आहे. 

जेईई, इग्‍नूसह अन्‍य विद्यापीठांच्‍या परीक्षांचा समावेश 

राष्ट्रीय स्‍तरावरील अभियांत्रिकी इन्‍स्‍टिट्यूटमध्ये प्रवेशासाठी आवश्‍यक असलेल्‍या जेईई मेन्‍स परीक्षेकडे सर्वांचे लक्ष लागून होते. नॅशनल टेस्‍टींग एजन्‍सीतर्फे यापूर्वी जानेवारी महिन्‍यात जेईई मेन्‍स परीक्षा घेण्यात आली होती. यानंतर दुसऱ्यांना एप्रिलमध्ये परीक्षा नियोजित होती. परंतु कोरोनामुळे उद्भवलेल्‍या परिस्‍थितीत या परीक्षेला स्‍थगिती द्यावी लागली होती. सर्वोच्च न्‍यायालयात दाखल याचिका फेटाळण्यात आल्‍याने आता जेईई मेन्‍स परीक्षेचा मार्ग मोकळा झाला आहे. त्‍यातच संगणकावर आधारीत जेईई मेन्‍स परीक्षा १ ते ६ सप्‍टेंबर दरम्‍यान बी.ई, बी.टेक. प्रवेशासाठी ४८९ परीक्षा केंद्रांवर, बी. आर्क. बी. प्‍लॅनिंगची २२४ शहरांमध्ये परीक्षा पार पडेल. यात बी.ई, बी.टेक प्रवेशासाठी ७ लाख ४६ हजार ११५ विद्यार्थी प्रविष्ठ झाले असून, विविध शिक्षणक्रम मिळून ८ लाख ५८ हजार २७३ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. शुल्‍क भरलेल्‍या सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश पत्र (ॲडमिट कार्ड) संकेतस्‍थळावर उपलब्‍ध करून दिले असल्‍याचे एनटीएतर्फे स्‍पष्ट केले आहे. 

१३ सप्‍टेंबरला नीट परीक्षा
 

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी आवश्‍यक असलेली नॅशनल इलिजिब्‍लीटी कम एंट्रान्‍स टेस्‍ट (नीट) परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. १३ सप्‍टेंबरला दुपारी दोन ते सायंकाळी पाच या वेळेत ही परीक्षा पार पडणार आहे. परीक्षेचे प्रवेशपत्र (ॲडमिट कार्ड) लवकरच उपलब्‍ध करून दिले जाणार असल्‍याचे एनटीएतर्फे स्‍पष्ट केले आहे. 

हेही वाचा > अचानक सायरनचा तो धडकी भरविणारा आवाज..नागरिकांत घबराट अन् सुटकेचा निश्वास! काय घडले नेमके?

अन्‍य प्रवेश परीक्षांच्‍या तारखा अशा

दिल्‍ली युनिव्‍हर्सिटी एट्रान्‍स टेस्‍ट (डीयुईटी) २०२०----------६ ते ११ सप्‍टेंबर 
इंडियन कौन्‍सिल ऑफ ॲग्रीकल्‍चरल रिसर्च (आयसीएआर)---७ व ८ सप्‍टेंबर 
इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्‍हर्सिटी (एमबीए)------------१५ सप्‍टेंबर 
युजीसी नॅशनल इलिजिब्‍लीटी टेस्‍ट (युजीसी-नेट)-----------१६-१८ आणि २१-२५ सप्‍टेंबर 
ऑल इंडिया आयुष पोस्‍ट ग्रज्‍ज्‍युएट एंट्रान्‍स टेस्‍ट-----------२८ सप्‍टेंबर 
इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्‍हर्सिटी (पी.एचडी.)--------४ ऑक्‍टोबर  

हेही वाचा > शिवप्रेमींत हळहळ; शिवप्रेमी रितेशची किल्ल्यावरील 'ती' सेल्फी शेवटची ठरली, काय घडले?

संपादन - किशोरी वाघ

loading image
go to top