esakal | धक्कादायक! पोलिस असल्याचे सांगून कोविड सेंटरमध्ये जबरदस्ती प्रवेश
sakal

बोलून बातमी शोधा

covid center

धक्कादायक! पोलिस असल्याचे सांगून कोविड सेंटरमध्ये जबरदस्ती प्रवेश

sakal_logo
By
युनूस शेख

नाशिक : महापालिका आयुक्तांकडून (Municipal Commissioner) कोरोनाचा प्रादुर्भाव (coronavirus) टाळण्यासाठी सेंटरमध्ये (covid center) नातेवाइकांना जाण्यास बंदी केली आहे. अशातच धक्कादायक घटना घडली आहे. ज्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. काय घडले नेमके?

हेही वाचा: धक्कादायक! चांदवडला रेमडेसिव्हिर ऐवजी भुलेच्या इंजेक्शनची विक्री

पोलिस असल्याचे सांगून कोविड सेंटरमध्ये जबरदस्ती प्रवेश

महापालिका आयुक्तांकडून कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सेंटरमध्ये नातेवाइकांना जाण्यास बंदी केली आहे. जबरदस्ती करणाऱ्या नातेवाइकांवर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याचे पत्र पोलिस ठाण्यांना दिले आहे. गुरुवारी (ता. ६) अनिल खरात नामक व्यक्ती सकाळी समाजकल्याण सेंटरमध्ये दाखल रुग्ण नातेवाइकास जेवणाचा डबा देण्यासाठी आत प्रवेश करत होती. सुरक्षारक्षकांनी त्यास अडविले. संबंधित व्यक्ती स्वतः पोलिस असल्याचे सुरक्षारक्षकांना सांगून जबरदस्ती आत प्रवेश करत होती. सुरक्षारक्षकांनी मज्जाव केला असता, त्याने वाद घातला. सुरक्षारक्षकांनी विभागीय अधिकारी स्वप्नील मुदलवाडकर यांना माहिती दिली. त्यांनी मुंबई नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ यांना घटनेची माहिती दिली. श्री. मुदलवाडकर आणि ढमाळ पथकासह घटनास्थळी दाखल झाले. अधिकाऱ्यांनी त्याच्याशी चर्चा करत असे करणे चुकीचे असल्याचे सांगितले.

पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पोलिस असल्याची बतावणी करत समाजकल्याण कोविड सेंटरमध्ये जबरदस्ती प्रवेश करणाऱ्याविरुद्ध मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. अनिल दत्तात्रय खरात असे संशयिताचे नाव आहे. तरीदेखील वाद घालत असल्याने त्याच्याविरुद्ध मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. आयुक्तांच्या पत्रानुसार अशा प्रकारे गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे. अशा प्रकारच्या कारवाईमुळे अन्य नातेवाइकांवर वचक बसेल.

हेही वाचा: लस वितरणातील नाशिकवरचा अन्याय दूर करा

loading image
go to top