Nashik News: आगामी मिनी मंत्रालयात प्रहार करणार एन्ट्री : शरद शिंदे

Officials and workers present at the review meeting of the party in the government rest house.
Officials and workers present at the review meeting of the party in the government rest house.esakal

Nashik News : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची अद्याप घोषणा झाली नसली तरी इच्छुकांनी गाठीभेटी सुरू केल्या आहेत. आरक्षण सोडतीनंतर चित्र स्पष्ट होईल तेव्हा होईल; परंतु त्यापूर्वीच सुरक्षित मतदारसंघासाठी फिल्डिंग लावल्याचे चित्र आहे.

निवडणुकीत प्रतिस्पर्धी कोणत्या पक्षाचा असेल, त्यांना हरविण्याचे डावपेच, मतांची गोळाबेरीज होत असली तरी यंदा मा. राज्यमंत्री बच्चू कडू यांचा प्रहार पक्ष देखील निवडणुकीत एन्ट्री करणार असल्याने प्रहारचा प्रभाव देखील उमेदवारांना विचारात घ्यावा लागेल.

आपल्या सामाजिक कार्यातून निफाड तालुक्यातील अंध, अपंग, दिव्यांग, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी यांच्या मोठ्या प्रमाणात असलेल्या समस्या प्रहारने सोडविल्या. येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये प्रहार पक्ष सर्व जागांवर उमेदवार उभे करणार असल्याची माहिती प्रहारचे जिल्हाप्रमुख शरद शिंदे यांनी दिली. (Entry to prahar janshakti in upcoming mini ministry Sharad Shinde Nashik News)

प्रहारचे उपजिल्हाप्रमुख सागर निकाळे यांच्या वतीने निफाड येथील शासकीय विश्रामगृह मध्ये पक्षाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पक्षप्रवेश, संघटना वाढावी, गाव तिथे शाखा, दिव्यांगांचा निधी, तसेच शेतकऱ्यांच्या समस्या यावर प्रामुख्याने चर्चा करण्यात आल्याची माहिती जिल्हाउपाध्यक्ष सागर निकाळे यांनी दिली.

प्रहार पक्ष तालुक्यातील गावागावांमध्ये पोचला असून, मा. राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या सामाजिक विचारांवर प्रेरित होऊन अनेकांनी मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश देखील केला आहे. सामान्य जनतेच्या समस्या मार्गी लावण्यासाठी प्रहार पक्ष कटिबद्ध आहे.

तसेच विविध सामाजिक विषयांची सोडवणूक केली असल्यामुळे प्रहारकडे सक्षम पर्याय म्हणून बघितला जात आहे. उमेदवारांच्या प्रचार सभेसाठी मा. राज्यमंत्री बच्चू कडू देखील ठिकठिकाणी सभा घेणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख शरद शिंदे यांनी दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Officials and workers present at the review meeting of the party in the government rest house.
SAKAL Impact : पंचवटी अमरधामध्ये पाणीपुरवठा सुरळीत

तर विकासकामांसाठी व लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रहार पक्ष निश्चितपणे पुढाकार घेऊन काम करेल व सर्व उमेदवार निवडून आणू, असा विश्वास जिल्हा उपाध्यक्ष सागर निकाळे यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख अमजद पठाण. युवाचे जिल्हाप्रमुख जगन काकडे, विद्यार्थ्यांचे जिल्हाअध्यक्ष दत्ता आरोटे, कामगार संघटनेचे ज्ञानेश्वर ढोली, अधीक्षक सुरेंद्र पगारे, प्रहारचे निफाड तालुकाध्यक्ष दिगंबर पाटील वडघुले, उपाध्यक्ष राहुल सोनवणे, युवा अध्यक्ष जयेश जगताप, शहराध्यक्ष शेरखान मुलाणी, तालुका संघटक नानाभाऊ सांगळे. तालुका सचिव अरुण थोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Officials and workers present at the review meeting of the party in the government rest house.
Entrepreneurship Training: संकल्प प्रकल्पांतर्गत उद्योजकता प्रशिक्षण; 102 ग्रामीण युवकांना मिळाला लाभ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com