SAKAL Impact : पंचवटी अमरधामध्ये पाणीपुरवठा सुरळीत

Streamlined water supply in Amardham
Streamlined water supply in Amardhamesakal

SAKAL Impact : गेल्या काही दिवसांपासून पंचवटी अमरधाममध्ये पाण्याचा पुरवठा बंद झाल्याने येथे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या मृतांच्या नातेवाइकांना पाण्याच्या आणीबाणीला सामोरे जावे लागत होते.

यामुळे अंत्यसंस्कारासाठी येताना मृतांच्या नातेवाइकांना घरूनच पाणी घेऊन येण्याची वेळ आली होती.

याबाबत ‘सकाळ’ मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर पंचवटी पाणीपुरवठा विभागाला जाग आली असून, कर्मचाऱ्यांनी तातडीने नळाची, टाक्यांची तसेच पाइपलाइनची दुरुस्ती करून घेत सर्व ठिकाणचा पाणीपुरवठा सुरळीत केला आहे. (SAKAL Impact Smooth water supply in Panchvati Amardham nashik)

यामुळे तेथे येणाऱ्या नातेवाइकांना पाण्याची व्यवस्था स्वतःच करावी लागत होती. ज्यांना येथे येण्याअगोदर पाणी नसल्याचे कळते ते घरून येतानाच पाण्याची भांडी भरून आणतात. मात्र, ज्यांना माहिती नाही त्यांना येथे आल्यानंतर पाण्याची शोधाशोध करून पाणी आणावे लागते.

येथे जवळ वस्ती नसल्याने दूरवरून पाणी आणावे लागत असल्याची खंत नागरिकांकडून व्यक्त केली जात होती. त्याची दखल घेत लोकभावना लक्षात घेत व्यथा मांडली होती. तर त्वरित पाणीपुरवठा सुरू होण्याबाबत अपेक्षा व्यक्त केली होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Streamlined water supply in Amardham
NMC News: ब्‍लॅक स्पॉटवरील अतिक्रमणे लवकरच होणार जमीनदोस्त; अतिक्रमण, नगररचना विभागाकडून संयुक्‍त मोहीम

उर्वरित दुरुस्तीही त्वरित व्हावी

पाण्याच्या समस्येबरोबरचं अमरधाममध्ये काही बेडदेखील तुटलेल्या अवस्थेत आहे. येथे बसविण्यात आलेल्या दिव्यांपैकी अर्धे दिवे फुटलेले व बंद अवस्थेत आहेत.

यामुळे रात्री अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या मृतांच्या नातेवाइकांना मोबाईलच्या प्रकाशात अंत्यसंस्कार करण्याची वेळ येत आहे.

तसेच अनेक पायऱ्यांची व इतर ठिकाणची फरशी देखील तुटलेली आहे. येथील नाल्यावरील ढापे तुटलेले आहेत, याचीदेखील तातडीने दुरुस्ती व्हावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Streamlined water supply in Amardham
Nashik News: गिर्यारोहकांसाठी ‘सह्याद्री ही एक वारी’ : लेखक आनंद पाळंदे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com