आदित्य ठाकरेंनी जपले नाशिककरांचे निसर्गप्रेम व अध्यात्मिक आस्था!

aditya thackeray
aditya thackerayesakal

नाशिक : राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya thackeray) यांनी नाशिककरांची अध्यात्मिक आस्था व निसर्गप्रेम जपल्याचे दिसून आले आहे. याचे कारण म्हणजे त्रिमूर्ती चौक ते मायको सर्कल येथील प्रस्तावित असलेल्या उड्डाणपूलासाठी (fly over) तब्बल २०० वर्षे जुने वडाचे झाड (banyan tree) तोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र या वडाच्या झाडाची दखल घेत आयुक्तांना (nashik muncipal corporation commissioner) थेट फोन लावला आहे. काय म्हणाले आदित्य ठाकरे?

प्रस्तावित असलेल्या उड्डाणपूलासाठी (fly over) तब्बल 200 वर्षे जुने वडाचे झाड (baniyan tree) तोडण्याचा निर्णय महापालिकेकडून घेण्यात आला होता तसेच त्यासंबधित नोटीसीही धाडली होती. यानंतर नाशिकमधील नाराज पर्यावरण प्रेमींनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना निवेदन पाठवले होते. त्यात लिहिले होते...

''त्रिमूर्ती चौक ते माईको सर्कल येथील प्रस्तावित असलेल्या उड्डाणपूलासाठी होणारी वृक्षतोडी व वृक्षछाटणी उच्च न्यायालयाच्या दिलेल्या आदेशांचे पालन करून वड, पिंपळ, औदुंबर सारख्या फायकस वरायटीच्या वृक्षांचे पुनर्रोपण वा तोड न करता यांचे संवर्धन व संरक्षण करण्याची जबाबदारी नाशिक महानगरपालिका व उद्यान विभागाची आहे. तरी आपण लावलेली नोटीस (जा क्र ४६७.दि.१७/०१/२०२१) ही उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा अवमान करणारी आहे. तरी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आपण या वृक्षतोडीची गांभीर्याने दखल घ्यावी ही विनंती''

aditya thackeray
Mumbai Fire : दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना मिळणार 5 लाखांची मदत

महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्याशी फोनवर चर्चा

यानंतर मंत्री आदित्य ठाकरे यांनी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्याशी फोनवर चर्चा केली असून येथील उड्डाणपुलाचा प्रस्तावित आराखड्यात बदल करावा असे सुचवले आहे. त्यामुळे महापालिका आता कार्य निर्णय घेणार याकडे लक्ष लागून आहे.

aditya thackeray
J&K : शोपियानमध्ये चकमक, 2 ते 3 दहशतवादी अडकल्याची शक्यता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com