सातपूर: खाण व पायाभूत सुविधा उद्योगांसाठी अग्रगण्य असलेली एपीरॉक एबी या स्वीडिश कंपनीने नाशिकमध्ये तब्बल साडेतीनशे कोटींची गुंतवणूक करीत आपल्या नवीन उत्पादन व संशोधन केंद्राचे भूमिपूजन केले. या वेळी कंपनीच्या ‘सीईओ’ हेलेना हेडब्लॉम, एपीरॉक इंडिया प्रमुख अरुणकुमार गोविंदराजन, एम. डी. चंदुराव रॉय व सरव्यवस्थापक कॅटरिना कोलकीग उपस्थित होते.