बदलत्‍या भारताच्‍या गरजा पूर्ण करणार ESDS; ‘एज क्‍लाउड’सह ब्‍लॉकचेन टेक्‍नॉलॉजी, IOT ठरणार प्रभावी

Piyush Somani, CEO, ESDS Software Solutions
Piyush Somani, CEO, ESDS Software Solutionsesakal

"डेटा सेंटरचा विचार केल्‍यास सद्यःस्थितीत भारताचे डेटा सेंटर १ गिगाहट्‌सपर्यंत पोचले आहे. जागतिक स्‍तरावर अमेरिकेतील डेटा सेंटरचा २.७ गिगाहट्‌सपर्यंत उपयोग होतो आहे. वापराबाबत अमेरिकेनंतर जगात भारताचा दुसरा क्रमांक आहे.

परंतु आजपासून दहा वर्षांपूर्वी भारत पहिल्‍या २० देशांमध्येही नव्‍हता. पण २०३० पर्यंत भारत अमेरिकेला पछाडताना ३ गिगाहट्सपर्यंत मजल मारताना डेटा सेंटरच्‍या क्षमता वापराबाबत प्रथम स्‍थानावर पोचेल.

भविष्यात ‘एज क्लाउड’, ब्‍लॉकचेन टेक्‍नॉलॉजी, इंटरनेट ऑफ थिंग्‍स (आयओटी) हे परिणामकारक ठरणार आहेत. आधुनिक भारताच्‍या गरजा बदलत चाललेल्‍या असून, या गरजा पूर्ण करण्यासाठी ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्‍यूशन कंपनी सदैव सज्‍ज आहे."

- पीयूष सोमाणी, मुख्य कार्यकारी अधिकारी, ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्‍यूशन

(ESDS to meet needs of changing India Blockchain Technology With Edge Cloud IOT To Be Impressive nashik news)

सध्या भारताच्‍या १३८ कोटी लोकसंख्येपर्यंत स्‍मार्टफोन पोचलेले आहे. सहाजिकच गेल्‍या दशकात भारताचे डेटा वापराचे प्रमाण ३० पटींनी वाढलेला आहे. ५जी सेवा अवगत झाल्‍यापासून तर काही क्षणात चित्रपट डाउनलोड करणे शक्‍य झालेले आहे.

नागरिकांची गरज वाढल्‍याने तंत्रज्ञानाचा वापरदेखील वाढलेला आहे. इंटरनेट ऑफ थिंग्‍स, ऑगमेंटेड रिॲलिटी, ब्‍लॉकचेन टेक्‍नॉलॉजी, थ्रीडी प्रिंटिंगसह अन्‍य आधुनिक तंत्रज्ञान प्रभावी ठरू लागले आहे. येत्‍या पाच वर्षांमध्ये ‘एज क्‍लाउड’ ही प्रणाली अत्‍यंत प्रभावी ठरणार आहे.

याआधी नमूद केल्‍यानुसार डेटा सेंटरबाबत भारत आघाडी घेणार असून, यासर्व बाबींमुळे विजेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. स्‍मार्ट मीटरिंग वापरकर्त्यांचे प्रमाण डिसेंबर २०२६ पर्यंत २५ कोटींपर्यंत पोचणार असून, ही सेवा पुरविण्यात ‘ईएसडीएस’ अव्वलस्‍थानी असल्‍याचा आम्‍हाला अभिमान आहे.

सध्या क्‍लाउडची ३५ टक्‍के क्षमता स्‍मार्ट मीटरिंगच्‍या वापरात असून, तंत्रज्ञानाच्‍या वाढत्‍या वापरासोबत क्‍लाउड सेवा वापराचे प्रमाणही भरमसाट वाढणार आहे.

केंद्र शासनाच्‍या महत्त्वाकांक्षी योजना असलेल्‍या मुद्रा पोर्टल साकारण्याचा बहुमान ‘ईएसडीएस’ ला मिळालाय. दहा राज्‍यांतील प्रशासकीय यंत्रणा, ४५० हून अधिक बँक, एनबीएफसीज‌चे संचलन कंपनीमार्फत होत असल्‍याचे श्री. सोमाणी यांनी सांगितले.

Piyush Somani, CEO, ESDS Software Solutions
Nashik News | राज्यात औद्योगिक विस्तारासाठी नाशिकच उत्तम पर्याय : धनंजय बेळे

डिजिटल करन्‍सी ठरेल प्रभावी

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून डिजिटल करन्‍सीची संकल्‍पना मांडलेली आहे. त्यामुळे भविष्यातील व्‍यवहार या डिजिटल करन्‍सीच्‍या माध्यमातून होऊ लागणार आहेत. ऑफलाइन पद्धतीने पैशांचे आदानप्रदान शक्‍य होणार असून, आयटी क्षेत्रासाठी डिजिटल करन्‍सीचा वापर प्रभावी ठरणार आहे.

ईएसडीएसच्‍या डेटा सेंटरची संख्या नेणार ६० पर्यंत

सध्या कंपनीचे चार डेटा सेंटर कार्यान्‍वित आहेत. पुढील दोन वर्षांत आणखी चार डेटा सेंटर उभारले जातील. तर २०३० पर्यंत देशात एकूण डेटा सेंटर्सची संख्या ६० पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे.

'एज क्‍लाउड' संकल्‍पनेबाबत कंपनीचे पेटंट प्राप्त तंत्रज्ञान 'एनलाइट क्‍लाउड' अत्‍यंत उपयोगी ठरणार आहे.

कृषीपासून शासकीय स्‍तरावर ब्‍लॉकचेन टेक्‍नॉलॉजी उपयुक्‍त

कंपनीमार्फत ब्‍लॉकचेन टेक्‍नॉलॉजीबाबत संशोधन केलेले असून, अगदी कृषी क्षेत्रात या तंत्रज्ञानाने आमूलाग्र बदल घडणार आहेत. पीक पद्धती, पीकवाढीची प्रक्रियेसह बाजारपेठेचे आकलन याबाबत सुसूत्रता येऊ शकेल.

बँकिंग क्षेत्रासाठीही हे तंत्रज्ञान अत्‍यंत महत्त्वाचे आहे. याशिवाय जीएसटी, आयकर विभागांमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर क्रमप्राप्त आहे. यामुळे करचुकवेगिरीला आळा घालताना व्‍यवहारांचे सूक्ष्म निरीक्षण करणे सुलभ होईल. बदलत्‍या काळानुरुप शासकीय यंत्रणेमध्येही ब्‍लॉकसेन टेक्‍नॉलॉजीचा प्रभावी वापर गरजेचा झाला आहे.

हेही वाचा: हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?

Piyush Somani, CEO, ESDS Software Solutions
नाशिक @2030 : संधीचं सोनं करण्यासाठी हवीय तयारी!

सुरक्षिततेवर ‘ईएसडीएस’चा भर

सध्याचे डेटा सेंटरचे मार्केट सुमारे २० हजार कोटींचे असून, पुढील काही वर्षांमध्ये ते ६० हजार कोटींपर्यंत पोचणार आहे. तंत्रज्ञानाच्‍या वाढत्‍या वापरासोबत सुरक्षिततेवर अधिक लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.

त्यामुळे ‘सेक्‍युरिटी’चे सध्याचे चार हजार कोटींचे मार्केट २०२८ पर्यंत दहा पटींनी वाढून ४० हजार कोटींपर्यंत पोचेल. २०३० पर्यंत ६० हजार कोटींपर्यंत पोचण्याची शक्‍यता आहे.

‘ईएसडीएस’च्‍या माध्यमातून आपल्‍या ग्राहकांना सुरक्षिततेची हमी देताना रॅनसमवेअर, हार्कवेबपासून अन्‍य धोकादायक स्‍थितींपासून बचाव करत डेटा कायम सुरक्षित ठेवण्यासाठी कटिबद्ध असते, असे त्‍यांनी आवर्जून नमूद केले.

नाशिकला विकासाच्‍या संधी

येत्‍या काही वर्षांमध्ये मुंबई हे जगात डेटा सेंटरची राजधानी होणार आहे. नाशिक हे मुंबईपासून जवळ असून, समृद्धी महामार्ग असेल किंवा वंदे भारत रेल्‍वे आदींच्‍या माध्यमातून जलद प्रवास साधणे शक्‍य होईल.

त्यामुळे 'डिझास्‍टर रिकव्‍हरी सेंटर' म्‍हणून विकसित होण्याच्‍या प्रचंड क्षमता नाशिकमध्ये उपलब्‍ध आहेत. ही गोष्ट हेरून शासनाने नाशिक परिसरात डेटा सेंटर पार्कसाठी किमान २० एकर क्षेत्र राखीव करणे गरजेचे आहे. सोबत विमानसेवा अधिक सुरळीत करण्याचा प्रयत्‍न होणेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे.

Piyush Somani, CEO, ESDS Software Solutions
EPFOने वाढीव वेतनावरील पेन्शनसंदर्भात अर्ज करण्याची तारीख वाढविली; जाणून घ्या अंतिम मुदत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com