MPSC Timetable : लोकसेवा आयोग परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune mpsc student protest demand

MPSC Timetable : लोकसेवा आयोग परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर

नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून २०२३ मधील नियोजित विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या https://mpsc.gov.inhttps://mpsconline.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असल्याची माहिती आयोगाचे सहसचिव सुनील अवताडे यांनी दिली आहे. (Estimated Timetable of MPSC Exams Announced Nashik News)

हेही वाचा: Nashik : पालकमंत्र्यांचा आयुक्तांना 15 दिवसांचा अल्टिमेटम

शासन सेवेतील विविध पदांवरील भरतीकरिता आयोगामार्फत वर्षभर विविध परीक्षांचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांचे वेळापत्रक आयोगाकडून निश्चित करण्यात आले आहे.

प्रस्तावित परीक्षेचे वेळापत्रक निश्चित करतांना संघ लोकसेवा आयोग, विविध विद्यापीठे, परीक्षा घेणाऱ्या इतर संस्था इत्यादींकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षा एकाच दिवशी येणार नाहीत व उमेदवारांचे नुकसान होणार नाही या दृष्टीने आयोगाच्या परीक्षांचे वेळापत्रक निश्चित करण्यात येते. तरी संबंधित संस्थानी परीक्षा एकाच दिवशी येणार नाहीत याची दक्षता घेण्याचे आवाहन आयोगाने केले आहे.

हेही वाचा: YCMOU Admission : विलंब शुल्‍कासह मुक्‍तमध्ये प्रवेशाची 15 पर्यंत मुदत

टॅग्स :NashikeducationMPSC Exam