YCMOU Admission : विलंब शुल्‍कासह मुक्‍तमध्ये प्रवेशाची 15 पर्यंत मुदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

YCMOU Latest marathi news

YCMOU Admission : विलंब शुल्‍कासह मुक्‍तमध्ये प्रवेशाची 15 पर्यंत मुदत

नाशिक : दूरस्‍थ शिक्षण उपलब्‍ध करून देणाऱ्या व राज्‍यभर विस्‍तार असलेल्‍या यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठातर्फे ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत वाढविली आहे. त्‍यानुसार १५ नोव्‍हेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरता येईल. प्रवेश अर्जास अभ्यासकेंद्र मान्‍यतेची मुदत २० नोव्‍हेंबरपर्यंत दिलेली आहे. (YCMOU Admission upto 15th november with late fee Nashik News)

हेही वाचा: Nashik : शेतकऱ्यांकडून कर्जवसुली थांबवा

कुलगुरूंच्या मान्‍यतेनुसार मुक्‍त विद्यापीठाच्‍या अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्‍यानुसार शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता कृषी शिक्षणक्रम, शालेय व्‍यवस्‍थापन पदविका, बी.एड., बी.एड. (विशेष) व एम.ए. (शिक्षणशास्‍त्र) हे अभ्यासक्रम वगळता अन्‍य पदविका, पदवी व पदव्‍युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी वाढीव मुदतीत अर्ज करता येणार आहे. यापूर्वी नियमित शुल्‍कासह ऑनलाइन प्रवेश अर्ज करण्याची मुदत संपलेली आहे.

त्‍यातच शंभर रुपये इतक्‍या विलंब शुल्‍कासह प्रवेश अर्ज करण्याची मुदत काल (ता.३१) पर्यंत होती. त्‍यात आणखी पंधरा दिवस वाढ करताना अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्‍ध करून दिली आहे. त्‍यानुसार आता विद्यार्थ्यांना १५ नोव्‍हेंबरपर्यंत प्रवेश अर्ज भरता येईल. तसेच प्रवेश अर्जास अभ्यासकेंद्र मान्‍यतेची मुदत १६ ते २० नोव्‍हेंबर अशी असेल. प्रवेश घेतलेल्‍या सर्व विद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्रवेश अर्ज हा निवडलेल्‍या अभ्यासकेंद्रावर विहित मुदतीत सादर करून प्रवेशास अभ्यासकेंद्राची मान्‍यता घ्यावी, असे विद्यापीठातर्फे कळविले आहे.

हेही वाचा: Nashik : पालकमंत्र्यांचा आयुक्तांना 15 दिवसांचा अल्टिमेटम

टॅग्स :NashikAdmissionYCMOU