कोट्यवधी रुपये खर्चूनही नागरिकांच्या हाती लोटा | | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोट्यवधी रुपये खर्चूनही नागरिकांच्या हाती लोटा!

नाशिक : कोट्यवधी रुपये खर्चूनही नागरिकांच्या हाती लोटा!

sakal_logo
By
सचिन चोबे

सिल्लोड : गाजावाजा करित दोन वर्षांपूर्वी तालूका पाणंदमुक्त घोषित करण्यात आला. परंतु अद्यापही अनेक गावांमध्ये प्रवेश करतांना तोंडावर रूमाल ठेवूनच प्रवेश करावा लागत असल्याची परिस्थिती आहे. तालुक्यात स्वच्छ भारत मिशनच्या अंतर्गत ३ कोटी ७ लाख ३२ हजार रूपये खर्च करून ४४ हजार १९८ शौचालयांचे बांधकाम करण्यात आल्याची नोंद पंचायत समितीच्या दप्तरी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे तालुक्यातील संपुर्ण शौचालय बांधकामाचे लक्ष पूर्ण झाल्याचे सांगण्यात येते. तथापि, अद्यापही अनेक ठिकाणी नागरिक उघड्यावरच प्रातविर्धीसाठी जात असल्याचे चित्र आहे.

प्रशासन पाणंदमुक्तीचा गवगवा करित असतांना याप्रकरणी ग्रामविकास राज्यमंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार यांनी जिल्हा परिषदेमध्ये मागील महिन्यांमध्ये बैठक घेऊन जिल्ह्यामध्ये अद्यापही काही कूटूंबे शौचालयाचा वापर न करता उघड्यावर शौचास जात असल्याचे निदर्शनास आणून देत याप्रश्नी तीव्र नाराजी व्यक्त करित सर्वांना धारेवर धरले होते. तालुक्यात पंचायत समितीचा कारभार बघता पदाधिकाऱ्यांचा अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांवर वचक राहिला नसल्यामुळे पंचायत समितीचा कारभार डामडौलपणेच सुरू असल्याचे चित्र आहे.

गावपातळीवर देखिल अशाप्रकारांना आळा घालण्यासाठी सुरूवातीला गुडमॉर्निंग पथकांची नियुक्ती करून आळा बसविण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु हि परिस्थिती जास्त काळ टिकली नसल्याचे वास्तव समोर आले आहे. कारवाई करून कागदोपत्री अहवाल देखिल तयार करण्यात आले असले तरी, आताची परिस्थिती बघता कागदोपत्री सुरू असलेला हा कारभार प्रत्यक्षात आणूण गाव खऱ्या अर्थाने हागणदारीमुक्त करणे गरजेचे आहे.

हेही वाचा: औरंगाबाद : भुयारी मार्गासाठी करणार शिवाजीनगरात भूसंपादन

आता तालुकास्तरीय पथकाची निर्मिती

मागील महिन्यात जिल्हा परिषदेमध्ये ग्रामविकास राज्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीनंतर तालूकास्तरीय पथकांची नियुक्ती करण्याचे निर्देश देण्यात आले.

या पथकामध्ये पंचायत समिती कर्मचाऱ्यांसोबतच महसूल व पोलिस कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्याचे सांगण्यात आले. तसेच गावपातळीवरील पथकामध्ये ग्रामसेवक, तलाठी, पोलिस पाटिल यांचा समावेश करण्याचे आदेशित करण्यात आले आहे. गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीनंतर अद्यापही अशा पथकांची नियुक्ती करण्यात आली नसल्याची माहिती समोर आली आहे.

loading image
go to top