Nashik ZP Bharti Exam: जि.प. पदभरतीसाठी 18 पासून परीक्षा

 exam
examesakal

Nashik ZP Bharti Exam: जिल्हा परिषदेतर्फे विविध संवर्गांसाठी पदभरती करण्यात येत आहे. या पदभरती जाहिरातीच्या अनुषंगाने आता कनिष्ठ सहाय्यक लिपिक, औषधनिर्माण अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदासाठी परीक्षा होणार आहे.

या तीन संवर्गातील पदांसाठी आयबीपीएस कंपनीतर्फे विविध परीक्षा केंद्रांवर १८ ते २६ डिसेंबरला ऑनलाइन परीक्षा होणार आहे. (Exam from 18 december for zp recruitment nashik news)

यासंदर्भातील जिल्हा परिषद पदभरतीचे वेळापत्रक व परीक्षा केंद्र यासाठीचे प्रकटन मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आले असून, जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर हे प्रकटन उपलब्ध करून देण्यात आले आहे.

सर्व परीक्षार्थींनी याबाबत नोंद घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

 exam
Police Patil Bharti: ४७६ गावांना मिळणार पोलीस पाटील ! 'या' ५ तालुक्यांत दहा वर्षांनंतर होणार भरती

होणाऱ्या परीक्षा अशा ः कनिष्ठ सहायक लिपिक : १८, १९, २० डिसेंबर.२) औषधनिर्माण अधिकारी : २१ व २६ डिसेंबर. ३) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक : २३, २४ डिसेंबर.

आयबीपीएस कंपनीच्या http://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php0appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04 या संकेतस्थळावरून विद्यार्थांना हॉलतिकीट उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांनी रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबर व ई-मेल आयडीवरही हॉल तिकिटची लिंक पाठविण्यात आलेली आहे.

 exam
MPSC Bharti 2023: ‘एमपीएससी’तर्फे 842 पदांसाठी भरती; वैद्यकीय शिक्षणात सर्वाधिक पदे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com