रेल्वे प्रवाशांच्या खिशाला झळ! विशेष उत्सव गाड्यांचे तिकीट 10 ते 30 टक्क्यांनी जास्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

diwali gardi.jpg

परंतु काही प्रवाशांना आरक्षण कसे करावे, हे माहीत नाही, त्यांना आरक्षण करता येत नाही. सायबर कॅफे व इतरांच्या मदतीने आरक्षण तिकिटासाठी जादा पैसे मोजावे लागत असल्याने गरीब प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत. 

रेल्वे प्रवाशांच्या खिशाला झळ! विशेष उत्सव गाड्यांचे तिकीट 10 ते 30 टक्क्यांनी जास्त

नाशिक रोड : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २२ मार्चपासून सुरू असलेली रेल्वेसेवा हळूहळू पूर्ववत होत आहे. दिवाळीनिमित्त रेल्वेने जादा उत्सव गाड्या सुरू केल्या आहेत. नाशिक रोड स्थानकांवरून अप-डाउन २८ गाड्या आणि आठवड्यातून एक, दोन, तीन दिवस अशा १४ गाड्या धावत आहेत दिवाळी उत्सव गाड्यांचे तिकीट विशेष गाड्यांपेक्षा दहा ते तीस टक्क्यांनी जास्त आहे. त्यामुळे प्रवाशासांना त्यांचा भुर्दंड सोसावा लागत आहे. 

गरीब प्रवाशांचे मात्र हाल 

१ जूनपासून विशेष गाड्यांच्या प्रतिसादानंतर रेल्वेने गाड्यांची संख्या वाढविली आहे. त्यात उत्सव गाड्यांची भर पडली आहे. विशेष गाड्यांचे आरक्षित तिकीट न मिळाल्याने प्रवाशांना जादा पैसे मोजवून उत्सव गाड्यांचे आरक्षण काढावे लागत आहे. त्यामुळे प्रवाशांना दिवाळीला घरी जाण्यासाठी वाढीव भाडे मोजावे लागणार आहे. कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने अनलॉक प्रक्रियेत रेल्वेने विशेष उत्सव गाड्या मोठ्या प्रमाणात सुरू केल्या आहेत. परंतु काही प्रवाशांना आरक्षण कसे करावे, हे माहीत नाही, त्यांना आरक्षण करता येत नाही. सायबर कॅफे व इतरांच्या मदतीने आरक्षण तिकिटासाठी जादा पैसे मोजावे लागत असल्याने गरीब प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत. 

रोज धावणाऱ्या रेल्वेगाड्या 
 

मुंबई-हावडा एक्स्प्रेस, वाराणसी एक्स्प्रेस, किनवट-नंदिग्राम एक्स्प्रेस, पंचवटी एक्स्प्रेस, गोंदिया-विदर्भ एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस ते पाटणा एक्स्प्रेस, गोरखपूर एक्स्प्रेस, पाटलीपुत्र एक्स्प्रेस, वाराणसी एक्स्प्रेस, कामाख्या एक्स्प्रेस, लखनौ एक्स्प्रेस, दरभंगा एक्स्प्रेस, वाराणसी एक्स्प्रेस, निजामउद्दिन एक्स्प्रेस. 

आठवड्यातून दोन ते तीन दिवस धावणाऱ्या गाड्या
 
लोकमान्य टिळक टर्मिनस ते भुवनेश्वर एक्स्प्रेस (बुधवार, शविनार), हाटिया एक्स्प्रेस (रविवार), विशाखापट्ट्नम एक्स्प्रेस (मंगळवार), मंडआडीह एक्स्प्रेस (सोमवार, शुक्रवार), प्रयागराज तुलसी एक्स्प्रेस (रविवार, मंगळवार), वास्को-नागपूर एक्स्प्रेस (रविवार), वास्को-पाटणा एक्स्प्रेस (गुरुवार), हरिद्वार (सोमवार, गुरुवार), गुवाहटी एक्स्प्रेस (बुधवार, शनिवार), गोरखपूर एक्स्प्रेस (रविवार, सोमवार, बुधवार, गुरुवार), छपरा एक्स्प्रेस (मंगळवार, गुरुवार, शनिवार), जबलपूर-गरीबरथ एक्स्प्रेस (रविवार, मंगळवार, गुरुवार), कानपूर एक्स्प्रेस (मंगळवार, शनिवार), पनवेल एक्स्प्रेस (सोमवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार) 

हेही वाचा >  भाजप नेत्याच्या वाढदिवसाचा भररस्त्यात जल्लोष! पोलिस प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

आठवड्यातून एक, दोन, तीन दिवस धावणाऱ्या गाड्या (अप) 

भुवनेश्वर एक्स्प्रेस (मंगळवार, शुकवार), हाटिया एक्स्प्रेस (शनिवार), विशाखापट्ट्नम एक्स्प्रेस (सोमवार), मंडआडीह एक्स्प्रेस (रविवार, बुधवार), प्रयागराज तुलशी एक्स्प्रेस (मंगळवार, गुरुवार), नागपूर-वास्को एक्स्प्रेस (शनिवार), वास्को-पाटणा एक्स्प्रेस (रविवार), हरिद्वार (बुधवार, शनिवार), गुवाहटी एक्स्प्रेस (मंगळवार, शुक्रवार), गोरखपूर एक्स्प्रेस (सोमवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार), छपरा एक्स्प्रेस (रविवार, मंगळवार, शुक्रवार), जबलपूर-गरिबरथ एक्स्प्रेस (रविवार, मंगळवार, गुरुवार), कानपूर एक्स्प्रेस (मंगळवार, शनिवार), पनवेल एक्स्प्रेस (सोमवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार), गोरखपूर एक्स्प्रेस (बुधवार, शनिवार).  

हेही वाचा > मामा होता म्हणून भाची सहीसलामत! अक्षरश: मृत्यूच्या दाढेतून खेचून आणले भाचीला

loading image
go to top