गटारी अमावस्या : तळीरामांवर एक्साईज, पोलिसांची करडी नजर | latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

drunkers latest marathi news

गटारी अमावस्या : तळीरामांवर एक्साईज, पोलिसांची करडी नजर

नाशिक : शुक्रवार (ता.२९) पासून श्रावण मासाला प्रारंभ होतो आहे. श्रावणमासात अनेकजण मद्यपान व मांसाहार वर्ज्य करतात. त्यामुळे श्रावणमासाला प्रारंभ होण्यापूर्वीच्या अमावस्येला मद्यपान करणाऱ्या तळीरामांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे.

तर बारचा परवाना नसलेल्या हॉटेल्ससह त्या ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. (Excise department watch on drunkers on Gatari Amavasya nashik Latest Marathi News)

श्रावणमासाचे पालन करणाऱ्यांना मद्यपान आणि मांसाहार करण्यासाठी बुधवार, गुरुवार ही दोन दिवस आहेत. गुरुवारी (ता. २८) अमावस्या असून याच दिवसाला गटारी अमावस्या संबोधले जाते. या दिवशी मद्यपान व मांसाहार करण्यासाठी बहुतांशी कामालाच सुटी देतात.

त्यामुळे व्यवसायाची संधी साधत अनेक हॉटेल्सकडून मोठ्या प्रमाणात नियोजनही केले जाते. विशेषतः परमीट बारमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होते. परंतु, अनेकांना हॉटेल्समध्ये मद्यपान करणे खर्चिक असल्याने असे तळीराम हे मद्य खरेदी करून शहराबाहेरील वा आड मार्गावरील हॉटेलमध्ये मद्यपान करून तेथेच मांसावर ताव मारतात.

त्यामुळे अशा हॉटेल्सवर राज्य उत्पादन शुल्क व शहर- ग्रामीण पोलिसांकडून करडी नजर ठेवली जाणार आहेत. तसेच, अपघातांची शक्यता गृहित धरून मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांवरही ड्रन्क ॲन्ड ड्राईव्हची कारवाई केली जाणार आहे.

हेही वाचा: ‘मासिक पाळी’मुळे वृक्षारोपणापासून विद्यार्थिनीस रोखले

त्यासाठी शहर पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनचालकांची तपासणी केली जाणार आहे. तर, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून विनापरवाना मद्यविक्री वा मद्यपान सुरू असलेल्या हॉटेल्स, तसेच विनापरवाना मद्यपान करणाऱ्याविरोधात कारवाई केली जाणार आहे.

त्यामुळे पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कडेकोट नियोजन करण्यात आले असून, भरारी पथकेही तैनात केली जाणार आहेत.

"बार परमीट नसलेल्या ठिकाणी मद्यपान सुरू असल्यास कारवाई केली जाईल. तसेच मद्याच्या अवैध वाहतूक रोखण्यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आलेली आहे."

- शशिकांत गर्जे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, नाशिक.

"मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध कारवाईसाठी वाहतूक शाखेकडून शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी केली जाणार आहे."

- सीताराम गायकवाड, सहाय्यक आयुक्त, वाहतूक शाखा, नाशिक.

हेही वाचा: त्र्यंबकेश्‍वरमध्ये आढळला दुर्मिळ विषारी विंचूच्या शेपटीचा कोळी

Web Title: Excise Department Watch On Drunkers On Gatari Amavasya Nashik Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..