Latest Crime News | ‘Excise’चे गुदाम फोडले; पावणेपाच लाखांचा मद्यसाठा लंपास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

Nashik Crime : ‘Excise’चे गुदाम फोडले; पावणेपाच लाखांचा मद्यसाठा लंपास

नाशिक : दिवाळीची धामधूम सुरू असताना, कुलूपबंद व सुरक्षारक्षक नसल्याची संधी साधून चोरट्यांनी पेठ रोडवरील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे गुदाम फोडून जप्त असलेला पावणेपाच लाख रुपयांचा मद्यसाठा चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना २१ ते २७ ऑक्टोबरदरम्यान घडली. (Excise warehouse burglary Liquor stocks worth five lakh stolen Nashik Latest Crime News)

हेही वाचा: Nashik Crime News : घरफोडीत लाखोंचा ऐवज लंपास

चोरट्यांनी व्हिस्कीच्या सुमारे ७८० बाटल्या चोरून नेल्या. याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक जयराम जाखेरे यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पेठ रोडला आरटीओ कार्यालयाशेजारी आदिवासी कॉलनी बिल्डिंग १ येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे गुदाम असून, राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत जप्त केलेला मद्यसाठा गुदामात ठेवला जातो.

शुक्रवार (ता. २१) ते गुरुवार (ता. २७) या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाचे गुदामाच्या खिडकीचे गज कापून आत प्रवेश केला व सुमारे पावणेपाच लाख रुपयांच्या व्हिस्कीचे प्रत्येक बॉक्समध्ये १२ नग, असे ६५ बॉक्स (७८० बाटल्या) चोरट्यांनी चोरून नेल्या. दीपावलीमुळे कार्यालय बंद असल्याने, तसेच त्या ठिकाणी सुरक्षारक्षक नसल्याची संधी साधून चोरट्यांनी हा डाव साधला.

साटेलोटे तर नाही

विशेष म्हणजे गटारी अमावास्या, तर कधी कोरोना लॉकडाउन काळात चोरट्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे गुदाम फोडून चोरी केल्याने मद्यचोर आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्यात काही साटेलोटे आहे की काय, असा सवाल उपस्थित होत आहे.

हेही वाचा: Nashik Crime News : घरफोडीत लाखोंचा ऐवज लंपास