Fake Bomb Call : बॉम्बच्या खोट्या माहितीने पोलिसांची धावपळ!

Fake Bomb Call
Fake Bomb Callesakal

जुने नाशिक : वडाळा नाका आणि ट्रॅक्टर हाऊस परिसरात बॉम्ब असल्याच्या वृत्ताने मुंबई नाका आणि भद्रकाली पोलिसांमध्ये धावपळ उडाली. घटनास्थळी दाखल होत तपासणी केली. एका मनोरुग्णाकडून ११२ हेल्पलाइन नंबरवर कॉल करून खोटी माहिती दिल्याचे उघड झाले. मुंबई नाका पोलिसांकडून मनोरुग्नस ताब्यात घेण्यात आले आहे. (Excitement among police with news of bomb at mumbai naka tractor house fake news Nashik News)

अकोले तालुक्यातील कातरापूर गावातील गोकुळ कोंडीराम तुंगार (वय.२०) याने वडाळा नाका इगतपुरी चाळ आणि ट्रॅक्टर हाऊस परिसर अशा दोन ठिकाणी बॉम्ब असल्याची माहिती ११२ हेल्पलाइन क्रमांकावर पोलिसांना दिली. कंट्रोल रूममार्फत मुंबई नाका आणि भद्रकाली पोलीस ठाण्यास माहिती देण्यात आली.

त्यांची एकच धावपडू झाली. दोन्ही पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी, बॉम्ब शोध पथक यांच्यासह अतिरिक्त पोलीस बंदोबस्त दोन्ही ठिकाणी दाखल झाला. बराच वेळ तपासणी करून दोन्हीही ठिकाणी कुठल्याही प्रकारची संशयित वस्तू आढळून आली नाही.

दरम्यान पोलिसांचा ताफा आणि बॉम्बशोधक पथक पाहून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. शेवटी पोलिसांनी कॉल आलेल्या मोबाईल क्रमांकावर तांत्रिक विश्लेषण प्रणाली विभागाकडून ट्रेस करण्यात आले. द्वारका परिसरातील एका हॉटेल जवळ मोबाईलचे लोकेशन आढळून आले. मुंबई नाका पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत.

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

Fake Bomb Call
Nashik Crime News : घरफोड्यांत 2 लाखांचा ऐवज लंपास

त्यास ताब्यात घेतले. त्याची अधिक चौकशी केली. तो पाच दिवसांपासून घर सोडून पळून आल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयाशी संपर्क केला. कुटुंबीयांनी तो मनोरुग्ण असून पाच दिवसापूर्वी घरातून निघून गेला आहे. त्याच्यावर उपचार सुरू असून तो रोज फोनवरून आज याठिकाणी तर उद्या त्याठिकाणी असल्याचे सांगत आहे.

असे सांगण्यात आले. पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन थांबवून ठेवले. त्याचे कुटुंबीय त्यास घेण्यासाठी रवाना झाले आहे. ते येताच त्यांच्या ताब्यात मनोरुग्ण तरुणास देण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील रोहकले यांनी दिली. शुक्रवारी सायंकाळी घडलेल्या घटनेने बराच वेळ पोलिसांची धावपळ करून सोडली होती.

Fake Bomb Call
Nashik Crime News : भाई तुरुंगातून बाहेर आला अन् चक्क कारागृहासमोरच समर्थकांनी जल्लोष केला!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com