Bhumi Abhilekh Bribe Case : भूमिअभिलेखच्या लिपीकाचे कारनामे चौकशीतून उघड

Bribe crime
Bribe crimeesakal

नाशिक : भूमिअभिलेख विभागात कार्यरत असताना कार्यक्षेत्र सोडून व अधिकार नसतांना जमीन मोजणी करणे, उतारे देण्यासाठी लाचेची मागणी करणे, अशा स्वरूपाचे संशयित लिपिकाचे कारनामे चौकशीतून उघड होत आहेत.

चौकशीतून सखोल बाबी समोर येण्याची शक्‍यता लक्षात घेता संशयित नीलेश शंकर कापसेच्‍या कोठडीत वाढ करण्याची मागणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. त्‍यानुसार कोठडीत बुधवार (ता.१) पर्यंत वाढ करण्यात आली आहे. (Exploits of Bhumi Abhilekh Bribe Case revealed through inquiry nashik news)

तक्रारदाराकडे चाळीस हजार रुपये लाचेची मागणी करताना ‘एसीबी’ च्‍या जाळ्यात अडकलेल्‍या भूमी अभिलेख कार्यालयातील लिपिक नीलेश कापसे यास मंगळवारी न्‍यायालयासमोर हजर केले.

प्राथमिक चौकशीदरम्‍यान त्‍याचे अनेक कारनामे समोर आल्‍यामुळे संशयित नीलेश कापसे याच्या कार्यपद्धतीची चौकशी केली जाणार असल्‍याचे समजते. गट क्रमांकाच्या खुणा दर्शविणे, कच्चा नकाशा देणे अशा कामांच्‍या मोबदल्यात संशयिताने तक्रारदाराकडून लाचेची मागणी केली होती.

लाचेची रक्‍कम घेताना भूमी अभिलेख विभागातील लिपिक कापसे यास काल (ता.२७) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलेली.

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

Bribe crime
Onion Crop : लासलगावला कांद्याचे लिलाव पूर्ववत

अधिकार नसतांना वाजवायचा कामे

दरम्‍यान विभागाने संशयिताच्‍या घर झडती केली. मात्र आक्षेपार्ह कागदपत्रे किंवा रोकड आढळून आली नसल्‍याचे सूत्रांनी सांगितले. परंतु संशयिताला अधिकार नसतांना, तो खुणा दर्शविणे, कच्चा नकाशा देणे यासह अन्‍य कामांसाठी लाच मागत असल्‍याने याबाबत आश्‍चर्य व्‍यक्‍त केले जाते आहे.

त्‍यामुळे विभागातील कार्यपद्धतीवर प्रश्‍नचिन्‍ह उपस्‍थित करताना विभागाने सखोल चौकशीची तयारी केलेली आहे.

Bribe crime
NAFED Onion Purchase | नाफेड मार्फत 950 टन लाल कांदा खरेदी : डॉ. भारती पवार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com