esakal | इलेक्ट्रीक बाईक वापरताना सावधान! नाशिकमध्ये बाईकचा स्फोट
sakal

बोलून बातमी शोधा

electric

इलेक्ट्रीक बाईकची बॅटरी चार्जिंग करताना स्फोट

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नाशिक : पेट्रोल-डिझेल महागाईच्या काळात जर तुम्ही इलेक्ट्रीक बाईक वापरत असाल तर सावधान! आवश्यक ती खबरादारी घेणेही तितकेच गरजेचे ठरत आहे. कारण इलेक्ट्रीक बाईकची बॅटरी चार्जिंग करताना स्फोट झाल्याची घटना नाशिकच्या इंदिरानगर परिसरातील पांडवनगरी येथे घडली. या दुर्घटनेत बॅटरीसह दुचाकी जळून खाक झाली. (Explosion-while-charging-battery-of-electric-bike-nashik-marathi-news)

जीवितहानी नाही, नुकसान प्रचंड

इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील पांडवनगरी परिसरातील ऐश्वर्या रेसिडेन्सीच्या पार्किंगमध्ये रहिवासी सुरजित सिंग यांनी सोमवारी (ता.१२) सकाळी इलेक्ट्रीक बाईक चार्जिंगसाठी वीज मीटर पेटीच्याजवळ मुख्य स्वीचमध्ये जोडणी करुन लावली होती. प्रमाणपेक्षा जास्त बॅटरी चार्ज झाल्याने तिचा स्फोट झाला. या घटनेत दुचाकी जळून खाक झाली. तर सोसायटीच्या वीज मीटरची पेटी जळाली. त्यामुळे सोसायटीचा वीजपुरवठा खंडीत झाला होता. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी येत आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या घटनेत जीवितहानी झाली नसली तरी दुचाकी, इलेक्ट्रीक बोर्डसह इमारतीचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा: नाशिकच्या सिक्युरिटी प्रेसच्या सुरक्षेला छेद; 5 लाख गायब

हेही वाचा: मंत्रीपद मिळूनही डॉ. भारती पवारांचा सोज्वळपणा कायम

loading image