नाशिक : टिश्‍यूकल्चर वनस्पतींची 50 टक्के नेदरलँडमध्ये निर्यात | latest agriculture news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tissue culture plant

टिश्‍यूकल्चर वनस्पतींची 50 टक्के नेदरलँडमध्ये निर्यात

नाशिक : देशातून टिश्‍यूकल्चर वनस्पतींची आयात करणाऱ्या दहा प्रमुख देशांमध्ये नेदरलँड, अमेरिका, इटली, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जपान, केनिया, सेनेगल, इथिओपिया आणि नेपाळचा समावेश आहे. २०२०-२१ मध्ये देशातून १७.१७ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतक्या रकमेच्या टिश्यू कल्चर वनस्पतींची निर्यात झाली. त्यातील पन्नास टक्के निर्यात नेदरलँडमध्ये झाली आहे.

टिश्यू कल्चर म्हणजे ऊती संवर्धन पद्धतीने वाढविलेल्या वनस्पतींच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार, ‘अपेडा‘तर्फे देशातील जैवतंत्रज्ञान विभागाकडून मान्यताप्राप्त टिश्यू कल्चर प्रयोगशाळांसह पर्णसंभार, रोपटी, कापलेली फुले आणि लागवडीसाठी उपयुक्त साहित्य यासारख्या टिश्यू कल्चर वनस्पतींच्या निर्यातीला प्रोत्साहन या विषयावर वेबीनार झाला. त्यातून ही माहिती पुढे आली. अपेडाच्या अधिकाऱ्यांनी टिश्‍यूकल्चर वनस्पतींना असलेल्या मागणीचे आधुनिक प्रकार आणि भारतीय निर्यातदार व टिश्‍यूकल्चर प्रयोगशाळांना नवीन बाजारात प्रवेश मिळवण्यासाठी अपेडातर्फे होणाऱ्या मदतीची माहिती दिली.

प्रयोगशाळांसाठीची खात्री

प्रयोगशाळांतर्फे टिश्यूकल्चर करण्यासाठीच्या लागवड साहित्याचे उत्पादन आणि त्याची निर्यात यासंबंधीच्या अडचणी व आव्हानांची माहिती देण्यात आली. या कार्यक्रमात निर्यातदारांनी वाढता विजेचा खर्च, प्रयोगशाळेतील कुशल कार्यबळाची कमी कार्यक्षमता पातळी, प्रयोगशाळांतील दूषित घटकांचे मिश्रण होण्याची समस्या, मायक्रो प्रपोगेटेड लागवड साहित्याच्या वाहतुकीचा वाढता खर्च आदी समस्यांकडे अपेडाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. अपेडाने संबंधित विभागांकडे या समस्यांचा पाठपुरावा करावा अशी सूचना टिश्यूकल्चर तज्ज्ञांनी यावेळी केली. टिश्यूकल्चर वनस्पती प्रयोगशाळांच्या अडचणी दूर करण्यासाठी सेवा देण्याची खात्री अपेडाच्या अधिकाऱ्यांनी प्रयोगशाळांच्या संचालकांना दिली.

हेही वाचा: नाशिक : ब्रिटिश काळातील बंधारा दुरुस्तीमुळे शेतीपिकांना नवसंजीवनी

ठळक नोंदी

1. टिश्यूकल्चर वनस्पतींची श्रेणी विस्तारण्यासाठी आयात करता येतील अशा मूळपेशी ‘जर्मप्लाझम'ची यादी देण्यास अपेडाने निर्यातदारांना सांगितले

2. टिश्यूकल्चर-जंगलातील-कुंडीत लावण्यायोग्य वनस्पती, शोभिवंत आणि लँडस्केपिंगसाठीचे लागवड साहित्य याचे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन अपेडाने घ्यावे अशी सूचना निर्यातदारांनी केली

3. टिश्यूकल्चर वनस्पतींना नव्या बाजारपेठा शोधण्यासाठी अपेडाने व्यापारी प्रतिनिधीमंडळ परदेशात पाठवावे आणि आयातदारांशी चर्चा करून काही व्यापारी सौद्यांना अंतीम स्वरूप द्यावे अशी सूचना निर्यातदारांनी केली

हेही वाचा: Video: ज्वारीसाठी कोणती बीजप्रक्रिया फायदेशीर?

Web Title: Export Of Tissue Culture Plants To The Netherlands Nashik

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top