esakal | दहावी, बारावीच्‍या क्रीडा गुणांच्‍या प्रस्‍तावासाठी मुदतवाढ
sakal

बोलून बातमी शोधा

HSC ssc

यंदा इयत्ता दहावी, बारावीच्‍या लेखी परीक्षा होऊ शकलेल्या नाहीत. अशात खेळांतील गत वर्षीच्‍या कामगिरीवर आधारीत क्रीडा सवलतीचे गुण दिले जाणार आहे. यासंदर्भातील प्रस्‍ताव सादर करण्यास मुदतवाढ दिली आहे.

दहावी, बारावीच्‍या क्रीडा गुणांच्‍या प्रस्‍तावासाठी मुदतवाढ

sakal_logo
By
अरुण मलानी

नाशिक : यंदा इयत्ता दहावी, बारावीच्‍या लेखी परीक्षा होऊ शकलेल्या नाहीत. अशात खेळांतील गत वर्षीच्‍या कामगिरीवर आधारीत क्रीडा सवलतीचे गुण दिले जाणार आहे. यासंदर्भातील प्रस्‍ताव सादर करण्यास मुदतवाढ दिली आहे. त्‍यानुसार पात्र विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयांमार्फत २१ जूनपर्यंत प्रस्‍ताव सादर करता येतील. (extension-for-ssc-hsc-students-applications-for-sports-quota-marks)

यासंदर्भात शिक्षण मंडळाने जारी केलेल्‍या परीपत्रकात म्‍हटले आहे, की महाराष्ट्र राज्‍य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेतल्‍या जाणार्या इयत्ता दहावी, बारावी परीक्षा कोरोना महामारीमुळे होऊ शकल्‍या नाहीत. अशात दहावीच्‍या परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थ्यांच्‍या बाबतीत इयत्ता आठवी, नववीत विद्यार्थ्यांच्‍या क्रीडा स्‍पर्धेतील सहभाग विचारात घेतला जाणार आहे. तर बारावीच्‍या विद्यार्थ्यांची इयत्ता अकरावीत असतांना क्रीडा कामगिरीचा आधार घेतला जात आहे. त्‍यानुसार २०२०-२१ या वर्षात दहावी, बारावीच्‍या विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण मिळण्याबाबतच्‍या क्रीडा प्रस्‍ताव सादरीकरणास मुदतवाढ दिली आहे. विद्यार्थ्यांनी शाळा, कनिष्ठ महाविद्यालयामार्फत जिल्‍हा क्रीडा अधिकार्यांकडे प्रस्‍ताव सादर करण्याकरीता उद्या (ता.१२) पासून २१ जूनपर्यंत मुदत असेल. तर संबंधित जिल्‍हा क्रीडा अधिकार्यांनी विभागीय मंडळाकडे प्रस्‍ताव व यादी सादर करण्याची मुदत १५ ते २५ जून दरम्‍यान असेल. विहीत मुदत पुन्‍हा वाढवून मिळणार नसल्‍याचेही स्‍पष्ट केले आहे.

(extension-for-ssc-hsc-students-applications-for-sports-quota-marks)

हेही वाचा: नाशिकमध्ये आता दुसरा 'मॅग्नेट मॅन'! बघण्यासाठी गर्दी