
नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी (NMC election) प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार याद्यांवर हरकतींचा पाऊस पडल्यानंतर हरकतींची छाननी व अंतिमतः तपासणी करताना कर्मचाऱ्यांच्या नाकीनऊ आले आहे. नाशिकसह राज्यातील चार महापालिकांमध्ये विक्रमी हरकतींची नोंद झाल्याने अंतिम मतदार यादी (Voter list) प्रसिद्ध करण्यासाठी मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे (State Election Commission) सादर केल्याची माहिती महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी दिली. (Extension proposal for final voter list NMC election Nashik news)
२३ जूनला महापालिकेकडून सहा विभागात प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या.
याद्या संकेतस्थळावर अपलोड करताना झालेला विलंब, तसेच हरकतींची संख्या लक्षात घेता मुदत वाढवून देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाला केलेल्या विनंतीनुसार ३ जुलै ही हरकत नोंदविण्याची अंतिम तारीख निश्चित करण्यात आली. शेवटच्या दिवशी दोन हजार ७२५ हरकती दाखल झाल्या. ४ जुलैला हरकतींचा अंतिम आकडा जाहीर करण्यात आला. यात पूर्व विभागात २४४, पश्चिम ४६, पंचवटी ३९६, नाशिक रोड २२२, सिडको २४३३, सातपूर १५५ तर ट्रू व्होटर्स ॲपवर ३५२ अशा एकूण तीन हजार ८४७ हरकती दाखल झाल्या. राज्यात कल्याण- डोंबिवली (५,७४६) व वसई- विरार (५००८) महापालिकेनंतर नाशिक महापालिकेत सर्वाधिक हरकती नोंदविल्या गेल्या.
हरकतींची छाननी करण्यासाठी आयुक्त पवार स्वतः मैदानात उतरले. पंचवटी व नाशिक रोड भागात सर्वाधिक हरकती असलेल्या प्रभागांमध्ये जाऊन नागरिकांशी संवाद साधला. दरम्यान, हरकतींची संख्या व प्रत्येक हरकतींची बारकाईने तपासणी करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडे अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यासाठी वेळ मागवून घेण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला.
प्रत्येक हरकतींची तपासणी
आयुक्त पवार यांनी प्रभागनिहाय नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना प्रत्येक हरकतींची तपासणीच्या सूचना दिल्या आहेत. तपासणीनंतर अंतिम मतदार यादी राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केली जाणार आहे. तपासणी करताना कामात कसूर आढळून आल्यास निलंबनाची कारवाईच्या सूचना दिल्याने कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
हलगर्जीपणाचा कळस
प्रारूप मतदार याद्या तयार करताना हलगर्जीपणाचा कळस गाठल्याचे समोर आले आहे. प्रारूप प्रभागरचना जाहीर करण्यात आली. त्याचवेळी निवडणूक आयोगाने मतदार याद्या तयार करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार याद्या तयार करण्यात आल्या, परंतु अंतिम प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर मतदार याद्यांमध्येदेखील दुरुस्ती करण्याची आवश्यकता असताना ती दुरुस्ती झाली नसल्याची बाब समोर आल्याने हजारो नावांचा घोळ झाल्याचे बोलले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.