Exam Alert : YCMOU च्‍या परीक्षा अर्जासाठी शुक्रवारपर्यंत मुदतवाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Extension till Friday for YCMOU exam application Nashik News

Exam Alert : YCMOU च्‍या परीक्षा अर्जासाठी शुक्रवारपर्यंत मुदतवाढ

नाशिक : यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठातर्फे (YCMOU) पुर्नपरीक्षार्थींसाठी परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे. याअंतर्गत नियमित शुल्‍कासह अर्ज दाखल करण्याची निर्धारित मुदत संपलेली असताना या मुदतीत वाढ करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. त्‍यानुसार आता नियमित शुल्‍कासह विद्यार्थ्यांना शुक्रवार (ता.२२) पर्यंत परीक्षा अर्ज भरता येणार आहे. शंभर रुपये विलंब शुल्‍कासह अर्ज भरण्याची मुदत २३ ते ३० एप्रिलदरम्‍यान असेल.

मुदतवाढीसंदर्भातील परिपत्रक विद्यापीठाने जारी केले आहे. त्‍यानुसार आत्तापर्यंत परीक्षा अर्ज दाखल न केलेल्‍या विद्यार्थ्यांना या वाढीव मुदतीत ऑनलाइन अर्ज (Online Application) दाखल करता येणार आहे. सर्व शिक्षणक्रमांच्‍या एक किंवा त्‍यापेक्षा जास्‍त विषयात अनुत्तीर्ण झालेल्‍या विद्यार्थ्यांना पुर्नपरीक्षेसाठी हा अर्ज भरणे बंधनकारक असणार आहे. यात प्रमाणपत्र, पदविका, पदवी (व्‍यावसायिक, तांत्रिक, विज्ञान) लेखी परीक्षा १३० रुपये प्रती पेपर इतके शुल्‍क आहे. पदव्‍युत्तर पदवी (PG) आणि सर्व शिक्षणक्रम पदवी व्‍यावसायिक, तांत्रिक, विज्ञान शाखेचे सर्व शिक्षणक्रमांकरीता दीडशे रुपये प्रती पेपर इतके शुल्‍क निर्धारित केले आहे. याशिवाय प्रात्‍यक्षिक, व्‍हायव्हा (VIVA) परीक्षेकरीता तीनशे रुपये प्रती पेपर, गुणपत्रिकेसाठीचे शुल्‍क शंभर रुपये प्रती सत्र/वर्ष असे अदा करावे लागणार आहे.

हेही वाचा: Cricket : महिला T-20 स्‍पर्धेत मायाची भेदक गोलंदाजी; टिपले 4 बळी

शुल्‍क भरावे लागणार ऑनलाइन

निर्धारित शुल्‍क विद्यापीठाला आरटीजीएस (RTGS), ऑनलाइन पेमेंट (Online Payment), फोनपे (PhonePe), गुगल पे (GPay) किंवा धनाकर्ष (DD) च्‍या माध्यमातून अदा करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी पुन्‍हा कुठल्‍याही कारणास्‍तव मुदतवाढ दिली जाणार नसल्‍याने निर्धारित मुदतीत अर्ज भरण्याचे आवाहन विद्यापीठातर्फे केले आहे.

हेही वाचा: नाशिक विभागात भोंग्यांचा आवाज मोजण्याचे आदेश

Web Title: Extension Till Friday For Ycmou Exam Application Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..