Nashik News : 2 वर्षात 300 जणांनी उचलले टोकाचे पाऊल; तालुक्यातील शेतकऱ्यासह तरुणांची संख्या अधिक

रोजगाराचा वाणवा, वाढता खर्च, व्यसन, नैराश्य, कर्ज बाजारीपणा यातून तरुण व तरुणी नैराश्यात जात आहेत.
suicide
suicideesakal

Nashik News : रोजगाराचा वाणवा, वाढता खर्च, व्यसन, नैराश्य, कर्ज बाजारीपणा यातून तरुण व तरुणी नैराश्यात जात आहेत. शेतकऱ्यांबरोबरच शहरी भागातही तरुणांचे आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे.

जन्म घेणं झालं अवघड, अन्‌ मरण झाल सोपं अशी स्थिती झाली आहे. मागील दोन वर्षात शहर व तालुक्यातील ३२० जणांनी विष, गळफास, पाण्यात उडी मारून व विविध प्रकारे आत्महत्या केल्या आहेत. (Extreme step taken by 300 people in 2 years nashik news)

राज्यात कर्ज, दुष्काळ, गारपीट, अवकाळी पाऊस आणि पीकांना मिळत असलेला मातीमोल भाव या सर्वाला कंटाळून अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे. मोबाईल आल्यापासून अनेकांच्या गरजा उंचावल्या. मोबाईल पाहून ऐशो आरामचे आयुष्य जगण्याच्या नादात अनेक तरुण कर्जबाजारी तसेच व्यसनाच्या आहारी गेले.

अशातच तालुक्यातील तरुणांच्या हाताला काम नसल्याने आणि व्यसनामुळे तो कर्जबाजारी होवू लागला आहे. यातच शहरात यंत्रमाग तर ग्रामीण भागात शेती या शिवाय दुसरे रोजगाराचे साधन नाही. या सर्व प्रकाराने तरुण नैराश्‍याच्या गर्तेत जात आहेत. यातून आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल उचलले जात आहे. शहरात तरुणांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे.

suicide
Nashik Crime News : चंदनपुरी शिवारात बंदुकीचा धाक दाखवून दोघांना लुटण्याचा प्रयत्न

यंत्रमाग कामगार दिवसाला १२ तास काम करून आठवड्याला तीन हजार रुपये मिळतात. तशीच परिस्थिती ग्रामीण भागातही आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे हाताला काम नसल्याने घरी पैसे देणे अवघड होते. तसेच हप्ते भरले जात नाही. यातून कर्जबाजारी होऊन अनेकांनी गळफास आवळला आहे.

२०२३ मध्ये ग्रामीण भागात १०४ जणांनी आत्महत्या केल्याने शहराला मागे टाकले आहे. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये पूर्व भागातील तरुणांची संख्या मोठी आहे. शहरात आत्महत्येचा प्रकार थांबवावे यासाठी येथील धर्मगुरू, मौलाना व सामाजिक कार्यकर्ते यांनी कॉर्नर बैठक व समाजप्रबोधन मेळाव्यातून तसेच सोशल मीडियावर आवाहन केले. तरीही या घटना थांबत नाही.

suicide
Nashik Crime News : घर फोडून 19 तोळे सोने लंपास

दोन वर्षातील आत्महत्या

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२

शहर ५७

ग्रामीण ८४

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२३

शहर ७५

ग्रामीण १०४

''नैराश्य आल्यावर आत्महत्या हा पर्याय नाही. वाईट परिस्थिती आल्यावर त्याला सामोरे जावे. अडचणीतून मार्ग निघतो. समाजातील मोठ्या लोकांनी गरिबांची मदत करावी. विद्यार्थ्यांना शिक्षण देताना दबाव टाकू नये.''- मौलाना मोहम्मद उमरेन महैफुज रहमानी. मुस्लिम पर्सनल बोर्डचे सदस्य.

suicide
Nashik Crime News : खैर लाकडाची अवैध वाहतूक; हरसूल येथे वाहन जप्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com