मृत्यूनंतरही डोळे बघणार जग! दृष्टिबाधितांसाठी कुटुंबाचा निर्णय

eyes donation
eyes donationesakal
Summary

कोरोना महामारीच्‍या काळात अनेक महिन्‍यांपासून अवयवदानाची चळवळ मंदावली आहे. त्यामुळे अनेक अत्यवस्थ रुग्‍णांचा जीवनाशी संघर्ष सुरू आहे.

नाशिक : कोरोना महामारीमुळे सर्वत्र नकारात्‍मक वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे सामान्‍यांच्‍या जगण्यातही नकारात्‍मकता निर्माण झालेली आहे. परंतु याच वातावरणात माणुसकीचे दर्शन घडते आहे, हेही तितकेच खरे आहे.(eye donation of sunita wagh)

कोरोना काळात अवयवदानाची चळवळ मंदावली

सिक्‍स सिग्‍मा हॉस्‍पिटलमध्ये सुनीता वाघ यांना कोरोनाची लागण झाल्‍याने ७ मेस दाखल करण्यात आले होते. डॉक्‍टरांचे शर्थीचे प्रयत्‍न आणि इच्‍छाशक्‍तीच्‍या जोरावर त्‍यांनी तब्‍बल १७ दिवस चाललेल्‍या उपचारानंतर कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली. मात्र आरोग्‍यविषयक अन्‍य समस्‍यांमुळे गेल्‍या सोमवारी (ता. २४) त्‍यांचे निधन झाले. उपचारात वाघ यांच्‍याप्रमाणेच संपूर्ण वाघ परिवार शर्थीचे प्रयत्‍न करत होता. अशात या घटनेने वाघ कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. अशा स्‍थितीतही वाघ कुटुंबीयांनी दिवंगत सुनीता वाघ यांचे दोन्‍ही डोळे दान करण्याचा निर्णय घेतला. सुशील नेत्रालय येथील वैद्यकीय टीमच्या मदतीने नेत्रदान स्‍वीकारले. कोरोना महामारीच्‍या काळात अनेक महिन्‍यांपासून अवयवदानाची (Organ Donation) चळवळ मंदावली आहे. त्यामुळे अनेक अत्यवस्थ रुग्‍णांचा जीवनाशी संघर्ष सुरू आहे. अशात नेत्रदानाच्‍या या निर्णयामुळे अवयवदानाच्‍या मोहिमेसाठी आशेचा किरण निर्माण झाला आहे.

eyes donation
नाशिक शहरात अवघे ५ टक्के लसीकरण पूर्ण

दोन दृष्टिबाधितांना जग बघण्याची संधी

सुनीता यांनी कोरोनाविरुद्धचा लढा (Fight With corona) जिंकला. पण आरोग्‍यातील गुंतागुंतीमुळे आजारपणातून बाहेर येऊ शकल्या नाहीत. निधनानंतर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना कुटुंबीयांनी अशा परिस्थितीतही सामाजिक जाणीव ठेवत नेत्रदानाचा निर्णय घेतला. यातूनच सुनीता विलास वाघ (वय ५३) यांच्‍या डोळ्यांनी आता दोन दृष्टिबाधितांना जग बघण्याची संधी मिळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com