Nashik News : आता शासकीय योजनांचीही भरणार जत्रा! आजपासून महिनाभर चालणार यात्रेची तयारी

Government Schemes
Government Schemesesakal

Nashik News : शासकीय योजनांचे एकाच छताखाली लाभ देण्यासाठी शासनाने ‘जत्रा शासकीय योजनांची’ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार सगळ्या शासकीय योजना एका छताखाली देणाऱ्या जत्रेसाठी उद्या (ता.१५) पासून तयारी केली जाणार आहे. (fair of government schemes preparations for fair will last for month from today Nashik News)

कल्याणकारी योजनांची माहिती सामान्यांना माहिती देण्यासाठी शासनानेच आता शासकीय योजनांची जत्रा भरविण्याचा निर्णय घेतला आहे. शासकीय योजनांवर शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो.

पण अनेकदा ज्येष्ठांसह लाभार्थ्यांना शासकीय कचेरीत जाऊन योजनांचा लाभ घेणे अवघड होत असल्याने विविध कागदपत्रांची पुर्तता करण्यासह त्रुटी दूर करण्यासाठी चकरा माराव्या लागतात. अनेकदा कार्यालयात अडवणूक होते.

या अडचणीचा विचार करता राज्यात चाळीसगाव, जामनेर, मुरबाड आणि कल्याण भागात जत्रा शासकीय योजनांची हा उपक्रम राबविण्यात आला होता. अशा प्रकारे राज्यात सगळीकडे हा उपक्रम राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Government Schemes
Nashik News : नाशिकमधल्या मराठी भाषा अभ्यासकेंद्राच्या कामाला वेग; सत्यजीत तांबेनी घेतला आढावा

शासकीय योजनांच्या जत्रेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी, तालुकास्तरावर जनकल्याण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी हे अभियानाचे प्रमुख असणार आहे. इतर सगळे विभाग त्यांच्या देखरेखीसाठी कार्यरत असतील.

उद्यापासून तर १५ मे पर्यत या जत्रेची तयारी केली जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात किमान ७५ हजार लाभार्थ्यांना थेट लाभ देण्याचे नियोजन आहे. त्यात, सलग दोन दिवस उपक्रम राबविण्यात येऊन येणाऱ्या प्रत्येक अर्जावर नियोजन केले जाणार आहे.

Government Schemes
ZP Recruitment : जिल्हा परिषदेच्या पदभरतीचा मार्ग खुला; भरती प्रक्रियेसाठी IBPS कंपनीची नियुक्ती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com