Fake Medical Certificate case
Fake Medical Certificate caseesakal

Fake Medical Certificate Case : खासगी रुग्णालयाची होणार चौकशी

नाशिक : शासकीय सेवेत काम करताना बदली किंवा इतर कामासाठी कुटुंबातील व्यक्ती गंभीर आजारी असल्याचे बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र देणारी टोळीविरुद्ध ग्रामीण पोलिसांनी कारवाई केल्यानंतर आता या प्रकरणात खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया झाल्याचे बनावट प्रमाणपत्रे सादर केलेल्या त्या रूग्णालय, तेथील वैद्यकीय अधिकारी यांची देखील या प्रकरणात चौकशी केली जाणार आहे.

त्या संदर्भात कार्यवाही सुरू करण्यात आली असल्याची माहिती ग्रामीण पोलिस दलाचे अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली. शासकीय विश्रामगृह येथे आयोजित बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (Fake Medical Certificate Case Private Hospital will be investigated Nashik Latest Marathi News)

पोलिस अधीक्षक श्री. पाटील म्हणाले, की बदलीसाठी कुटुंबातील व्यक्ती आजारी, जोखमीची शस्त्रक्रिया झाल्याचे बनावट प्रमाणपत्र छाननी समितीस आढळून आल्यानंतर या प्रकरणी जिल्हा रुग्णालयाने दिलेल्या अहवालानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघा संशयित यांना अटकही झाली आहे.

संशयित यांच्या चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीवरून बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याची मोठी साखळी आहे. यात अनेक वरिष्ठ अधिकारी व त्यांच्या सहकारी यांचा सहभाग आहे. जी शस्त्रक्रिया कधी झालीच नाही, अशी शस्त्रक्रिया झाल्याचे प्रमाणपत्र त्यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

यात २४ बनावट प्रमाणपत्र आढळून आली आहेत. यानंतर इतर विभागातून देखील अनेक प्रमाणपत्र मिळू शकतात. त्यादृष्टीने तपास सुरु असून यात खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया केल्याचे उघड झाले आहे. त्या फायली देखील तपासल्या जात आहे. या गुन्ह्यात देखील त्या रुग्णालयांची चौकशी केली जाणार आहे. या शिवाय इतर संशयितांविरुद्ध देखील पुरावे गोळा केले जात असल्याचे अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले.

Fake Medical Certificate case
Nandurbar : सफाई कामगाराच्या मुलाला शिक्षणासाठी मदत

प्रमाणपत्र छाननीत उघड झाला प्रकार

अधीक्षक सचिन पाटील यांच्या अध्यक्षतेखालील छाननी समितीतील सदस्य यांनी या प्रमाणपत्रांची छाननी केली. यात शस्त्रक्रियेसंदर्भात बाह्यरुग्ण कक्षेची कागदपत्रे आढळली तर शस्त्रक्रिया झाली नसल्याची कागदपत्रे जोडली नसल्याने संशय बळावला गेला.

दाखल वैद्यकीय प्रमाणपत्रातील शस्त्रक्रिया कोरोना काळात झाल्याचे आढळून आल्याने या बाबत जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक यांनी देखील अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेसाठी परवानगी न दिल्याचे समजल्यानंतर प्रमाणपत्रांच्या बाबतीत संशय आणखी बळावला.

त्यानंतर शस्त्रक्रिया करण्यात आलेली रुग्णालये तपासली असता ती एका खोलीची रुग्णालये असल्याचे व तीही बंद असल्याचे आढळले. त्यातून हा सर्व प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणाची व्याप्ती उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यात देखील असू शकते.

संशयितांची अटकपूर्वसाठी धावपळ

बनावट वैद्यकीय प्रमाणपत्राचे रॅकेट उघड झाल्यानंतर यातील संशयित यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात अनेक वरिष्ठ दर्जाचे अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. यातच जिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ दर्जाचे वैद्यकीय अधिकारी हे रजेवर गेले असून ते अटकपूर्व जामिनासाठी धावपळ करीत असल्याची माहिती समोर येत आहे.

Fake Medical Certificate case
Political : मशिदीवरील भोंग्यांवरून MNS पुन्हा मैदानात; 7 दिवसांचा अल्टिमेटम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com