Fake Police
sakal
नाशिक, जुने नाशिक: शहरात दररोज वयस्क महिला वा ज्येष्ठ नागरिकास गाठून तोतया पोलिस असल्याची बतावणी करीत त्यांचे मौल्यवान दागिने लंपास करण्याचे प्रकार घडत आहेत. उपनगर, इंदिरानगर हद्दीतील घटनेपाठोपाठ चोपडा लॉन्सजवळ ७५ वर्षीय महिलेला लक्ष्य करीत तोतया पोलिसांनी लुबाडल्या प्रकार घडला आहे. एकापेक्षा अधिक घटना होऊनही तोतया पोलिस खऱ्या पोलिसांच्या हाती लागलेले नाही.